​ मेस्सीला २१ महिन्यांचा कारावास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2016 02:23 PM2016-07-06T14:23:58+5:302016-07-06T19:53:58+5:30

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने अलीकडे अगदी तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. तेव्हा सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकला. आता मेस्सी नव्या अडचणीत सापडला आहे. कर चुकवेगिरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये बार्सिलोना न्यायालयाने मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना दोषी ठरवले. न्यायालयाने दोघांना २१ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Messi imprisoned for 21 months! | ​ मेस्सीला २१ महिन्यांचा कारावास!

​ मेस्सीला २१ महिन्यांचा कारावास!

Next
प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने अलीकडे अगदी  तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. तेव्हा सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकला. आता मेस्सी नव्या अडचणीत सापडला आहे. कर चुकवेगिरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये बार्सिलोना न्यायालयाने मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना दोषी ठरवले. न्यायालयाने दोघांना २१ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर मेस्सीला २० लाख युरोचा दंडही ठोठावला आहे. अर्थात मेस्सी या शिक्षेविरोधात स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. मेसी आणि त्याचे वडिल जॉर्ज मेसी यांनी कर टाळण्यासाठी बनावट कंपन्यांच्या साखळीचा वापर केल्याचा  आरोप आहे. सन २००७-०९ मध्ये मेसीने त्याचे इमेज राईट विकले होते त्यातून मिळालेल्या उत्पन्नात कर चुकवेगिरीचा आरोप होता. न्यायालयाने या आरोपांमध्ये मेस्सी व त्याच्या वडिलांना दोषी ठरवून २१ महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

तुरुंगात जाण्याची आवश्यकता नाही
स्पॅनिश कायद्यानुसार तुम्ही दोन वर्षांची शिक्षा नजरकैदेत राहून पूर्ण करु शकता. त्यासाठी तुरुंगात जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मेस्सीला तुरुंगात जावे लागण्याची शक्यता कमी आहे. मेस्सीचे वडिल जॉर्ज यांना पंधरा लाख युरोचा दंड ठोठावला आहे. मेसीने चाळीस लाख युरोचा कर भरण्याचे टाळून स्पेनची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप होता. जगातील सर्वात महागडा फुटबॉल खेळाडू असणा-या मेसीवर कर घोटाळयाचा आरोप होता. 
  

Web Title: Messi imprisoned for 21 months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.