जगातली सर्वात लहान बॅग? लोकांना प्रश्न, यात काय चॉकलेट ठेवायचंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 12:32 PM2019-03-06T12:32:11+5:302019-03-06T12:35:36+5:30
पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये यावेळी दोन थीम होत्या. एक म्हणजे विशाल ड्रेस ज्याने व्यक्ती त्यात झाकला जाईल आणि दुसरी म्हणजे इतकी छोटी वस्तू जी आपल्याला बघण्यासाठी डोळ्यांना मेहनत करावी लागेल.
पॅरिसच्या फॅशन वीकमध्ये यावेळी दोन थीम होत्या. एक म्हणजे विशाल ड्रेस ज्याने व्यक्ती त्यात झाकला जाईल आणि दुसरी म्हणजे इतकी छोटी वस्तू जी आपल्याला बघण्यासाठी डोळ्यांना मेहनत करावी लागेल.
गेल्या आठवड्यात झालेल्या कॅटवॉकमध्ये Jacquemus Mini Le Chiquito च्या बॅग बघायला मिळाल्यावर जगभरातील लोक कपाळावर हात मारून घेत आहेत.
या ट्रेन्डी बॅगची किंमत नंतर जाणून घेऊ. आधी या बॅगची साइज जाणून घेऊया. ही बॅग ५.२ सेमी लांब म्हणजेच दोन इंच लांब आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या बॅगमध्ये क्रेडिट कार्ड सुद्धा ठेवता येऊ शकत नाही. इतकी ती लहान आहे.
बाजारात आधीच असलेल्या Le Chiquito च्या छोट्या बॅगचं हे मिनी व्हर्जन आहे. गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या या बॅगची लांबी १२ सेमी होती. या बॅगची किंमत ३५ हजार रूपये आहे. ही बॅग अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून विकली गेली होती.
कंपनीने अजूनही या मायक्रो मिनी बॅगच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. पण सोशल मीडियातून या बॅगमध्ये ठेवायचं काय यावरून गोंधळ सुरू आहे.
ट्विटरवर लोक या बॅगवरून कंपनीची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिले की, कदाचित ही बॅद मिंट किंवा टॉफी ठेवण्यासाठी तयार केली असावी.
फ्रेन्च लेबल जॅक्वेमसने पॅरिस फॅशन वीकमध्ये जेव्हा ही बॅग सादर केली, तेव्हा अनेक लोक मॉडलच्या बोटांमध्ये लटकलेल्या या बॅगला बघूच शकले नाही.
एल मॅगझिनने लिहिले आहे की, या बॅगमध्ये केवळ एक एअरपॉड किंवा एअरफोन ठेवला जाऊ शकतो.
Jacquemus चे २९ वर्षीय फाऊंडर सिमॉन पोर्ट यांनी फॅशनच्या विश्वात फार नाव कमावलं आहे.
पोर्ट ड्रेसेसमध्ये फार कलात्मकता दाखवतात. याआधी ते शोल्डर बॅग्स तयार करून चर्चेत आले होते.