MOBILE GAMES: ‘सुपर मारिओ रन’गेम मार्च महिन्यात अँड्रॉईडवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2017 10:42 AM2017-01-22T10:42:18+5:302017-01-22T16:12:18+5:30
मारिओ आणि मोबाईल गेम्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अॅपलनंतर ‘सुपर मारिओ रन’ हा गेम येत्या मार्च महिन्यात अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवरदेखील उपलब्ध होणार आहे. ‘गुगल प्ले’वर त्याचे साईनअप्स स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे.
Next
ल ानपणी मारिओ हा व्हिडिओ गेम खेळला नसेल असे फार क्वचितच लोक असतील. व्हिडिओ गेम आणि मारिओ हे आता समानार्थी शब्द बनलेले आहेत. कारण प्रत्येकाच्या गेमिंगची सुरूवात याच गेमपासून होते. त्यामुळे मारिओ आणि मोबाईल गेम्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
केवळ अॅपल फोन्ससाठी लाँच झाल्यानंतर ‘सुपर मारिओ रन’ हा गेम येत्या मार्च महिन्यात अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवरदेखील उपलब्ध होणार आहे. म्हणजे त्यासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागेल परंतु अँड्राईडवर ‘सुपर मारिओ रन’चा आनंद घेता येणार म्हटल्यावर वाट पाहणे फायद्याचे ठरणार आहे.
हा गेम तयार करणारी कंपनी ‘नाईटेंडो’च्या जपान येथील कार्यालयाने केलेल्या ट्विटद्वारे ही माहिती दिली. जपानी भाषेत करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये सांगण्यात आले की, ‘२०१७च्या मार्च महिन्यात ‘सुपर मारिओ रन’चे अँड्राईड व्हर्जन लाँच करण्यात येणार असून ‘गुगल प्ले’वर साईनअप्स स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे.’
►ALSO READ: ‘पोकेमॉन गो’ची बेधुंद अशी झिंग
मागच्या महिन्यात ‘आयओएस’ प्लॅटफॉर्मवर हा गेम रिलीज करण्यात आला होता. आयफोन यूजर्सचा त्याला चांगला प्रतिसादही लाभला. तेव्हापासून गेमच्या अँड्राईड व्हर्जनची मागणी गेमलव्हर्स करीत होते. त्यांच्या मागणीला आता फळ मिळल्याचे अधिकृत संकेत मिळाले असेच म्हणावे लागेल.
‘नाईटेंडो’ने गेल्या वर्षी ‘पोकमॉन गो’ हा व्हर्च्युअल गेम रिलीज करून धमाल उडून दिली होती. हा मोबाईल गेम ’कल्चरल फेनोमेनन’ म्हणून गणला जावा एवढा प्रचंड लोकप्रिय झाला. ‘पोकेमॉन’ हे नाव ऐंशीच्या दशकानंतर जन्मलेल्या पीढीला ज्ञातच असेल. कार्टून सिरीज किंवा व्हिडियो गेमच्या माध्यमातून या पोकेमॉनने अख्ख्या पीढीला वेडे केलेले आहे.