​अधिक प्रभावी व स्वस्त सर्पविषरोधी विकसित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2016 01:05 PM2016-07-08T13:05:09+5:302016-07-08T18:35:44+5:30

आॅस्ट्रेलियाच्या संशोधकांनी अत्यंत स्वस्त आणि प्रभावी असे सर्पविषारोधी बनवले आहे.

More effective and cheap antiseptic developed | ​अधिक प्रभावी व स्वस्त सर्पविषरोधी विकसित

​अधिक प्रभावी व स्वस्त सर्पविषरोधी विकसित

Next
्पदंशामुळे जगभरात मोठी जीवितहानी होते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक विषरोधी उपलब्ध झाले आहेत; मात्र त्यांची किंमत हा मुद्दा अडथळा बनतो. यावर उपाय म्हणून आॅस्ट्रेलियाच्या संशोधकांनी अत्यंत स्वस्त आणि प्रभावी असे सर्पविषारोधी बनवले आहे. यामुळे सर्पदंशापासून अनेक पाळीव प्राण्यांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे.

‘कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आॅर्गनायझेशन’च्या (सीएसआयआरओ) संशोधकांनी विक्टोरिया प्रांतातील छोट्या बायोटेक कंपन्यांशी मिळून हे स्वस्त विषारोधी तयार केले आहे. आॅस्ट्रेलियात जगभरातील सर्वात विषारी सापांच्या १० प्रजाती आढळून येतात. असे साप चावल्यानंतर कुत्रे, मांजरी यांसारख्या घरगुती पाळीव प्राण्यांना महागड्या, अकार्यक्षम आणि सहज उपलब्ध न होणार्‍या विषारोधींमुळे प्राण गमवावा लागतो.

‘पडूला सिरम्स’चा अँड्य्रू पडूला सांगातो की, ‘सीएसआयआरओ’ची हात मिळवणी केल्यामुळे हे स्वस्त विषारोधी विकसित होऊ शकले. बर्‍याच काळापासून मी प्रभावी विषारोधी बनविण्याचा प्रयत्न करत होतो. ‘सीएसआयआरओ’च्या उपकरण आणि कौशल्यामुळे माझा प्रयत्न सत्यात उतल्याचा मला खूप आनंद आहे.

अंतिम चाचणी पूर्ण झाल्यावर ‘आॅस्ट्रेलियन पेस्टिसाईडस् अँड व्हेटेरिनरी मेडिसिन्स आॅथोरिटी’च्या परवानगीने ते बाजारात आणले जाणार आहे. हे विषरोधी मानवासाठीदेखील उपयुक्त आहे.
 

Web Title: More effective and cheap antiseptic developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.