मुलांच्या मेंदूविकासासाठी आईचे प्रेमगरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2016 02:06 PM2016-04-27T14:06:28+5:302016-04-27T19:37:20+5:30

लहान मुलांचा बौद्धिक विकास हा आईच्या काळजीवर जास्त अवलंबून असतो.

Mother's love affairs for children's brain development | मुलांच्या मेंदूविकासासाठी आईचे प्रेमगरजेचे

मुलांच्या मेंदूविकासासाठी आईचे प्रेमगरजेचे

Next
ान मुलांसाठी आईचे प्रेम किती महत्त्वाचे आहे हे एका नव्या रिसर्चमधून स्पष्ट झाले. ज्या मुलांना शाळेत जाण्या आगोदरच्या वयात आईचे भरभरून प्रेम, माया, काळजी लाभते, त्या मुलांची आकलन क्षमता, स्मरणशक्ती, तणाव नियंत्रण आदी बाबतीत मेंदूची संरचना अधिक बळकट होते.

आईवडिलांचा मुलांना वाटणारा आधार आणि विशेष करून आईचा मुलांच्या वाढीमध्ये असणारा सकारात्मक सहभाग त्यांची शाळेतील कागगिरी, एकंदर जीवनाविषयी दृष्टीकोन आणि भावनिक विकासाला चालना देतो.

सेंट लुई येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कुल आॅफ मेडिसिन येथील प्राध्यापिका जोअन लुबी यांनी माहिती दिली की, लहान मुलांचा बौद्धिक विकास हा आईच्या काळजीवर जास्त अवलंबून असतो.

या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या मुलांच्या मेंदूचे आयुष्यच्या विविध टप्प्यावर केलेल्या स्कॅनिंगमधून असे दिसून आले की, आईचे पे्रम लाभलेल्या मुलांच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस भागाचा स्थिर विकास होतो.

127 मुलांचे तीन वेळा एमआरआय स्कॅन करण्यात आले. प्रोसेडिंग्स आॅफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ सायन्सेस अर्ली एडिशनमध्ये या संशोधनाचे निष्कर्ष आॅनलाईन प्रकाशित करण्यात आले.

Web Title: Mother's love affairs for children's brain development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.