​नासाने लाँच केला ‘मार्स रोव्हर’ गेम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2016 02:19 PM2016-08-06T14:19:08+5:302016-08-06T19:49:08+5:30

‘क्युरोसिटी’ यान मंगळावर यशस्वीपणे उतरून आता चार वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून नासाने ‘मार्स रोव्हर’ नावाचा एक मोबाईल गेम तयार केला आहे.

NASA launches 'Mars Rover' game | ​नासाने लाँच केला ‘मार्स रोव्हर’ गेम

​नासाने लाँच केला ‘मार्स रोव्हर’ गेम

Next
मार्टफोनवर गेम खेळणाऱ्यांची संख्या लक्षात घेता मोबाईल गेमचे वेड किती व्यापक आहे हे लक्षात येते. परंतु केवळ टाईमपाससाठी नाही तर आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी, नवीन गोष्टी समजून घेण्यासाठीदेखील गेम्सचा वापर केला जाऊ शकतो हे नासाने नवीन मोबाईल गेम विकसित करून सिद्ध केले.

‘क्युरोसिटी’ यान मंगळावर यशस्वीपणे उतरून आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. हेच औचित्य साधून नासाने ‘मार्स रोव्हर’ नावाचा एक मोबाईल गेम तयार केला असून त्यामध्ये प्लेयरसमोर मंगळाच्या ओबडधोबड पृष्ठभागावर रोव्हरला संतुलित व दिशा देण्याचे आव्हान असेल. तुमच्या परफॉरमन्सनुसार तुम्हाला पॉर्इंटस् मिळत जातील.

एवढेच नाही तर या गेमद्वारे २०२० मध्ये नासा पाठवत असलेले पुढचे मंगळयान रडार तंत्रज्ञानाद्वारे कशाप्रकारे भूपृष्ठाखाली पाण्याचा शोध घेणार याचीदेखील माहिती देण्यात येणार आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या मिशेल वायोटी यांनी सांगितले की, या मोबाईल गेमच्या माध्यमातून क्युरॉसिटीचा आतापर्यंतचा प्रवास, अ‍ॅडव्हेंचर आणि नासाच्या भविष्यातील मंगळवारीबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करून देण्यास आम्ही खूप उत्सकु आहोत.

मंगळावर असलेल्या क्युरॉसिटी यानाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त सध्या ‘मरिम्बा’ नावाच्या खडकामध्ये ड्रिलिंग करून त्यातील रॉक पॉवडरचे विश्लेषण करणार आहे.

Web Title: NASA launches 'Mars Rover' game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.