केस स्ट्रेट हवेत? मग घरी केलेलं हे क्रीम लावूनच पाहा..
By admin | Published: June 28, 2017 02:57 PM2017-06-28T14:57:53+5:302017-06-28T14:57:53+5:30
तुमच्या सौंदर्यालाही लावील हे क्रीम चार चॉँद!
- मयूर पठाडे
आपल्या, विशेषत: महिलांच्या सौंदर्याचं रहस्य खासकरून त्यांच्या केसांवर अवलंबनू असतं. तुमचे केस जर चांगले असतील तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरही चार चॉँद लागतात आणि चारचौघांत तुम्ही चांगलेच उठून दिसता. पण अनेक तरुणी, महिलांचे केस कुरळे असतात आणि हे कुरळे केस सरळ कसे करायचे हा त्यांच्यापुढचा सर्वात मोठा प्रश्न असतो.
हे केस सरळ करण्यासाठी प्रत्येक तरुणी मग आपापल्या पद्धतीनं अनेक प्रयोग करते. त्यासाठी बऱ्याचदा केमिकल्सचाही वापर केला जातो. या केमिकल्सच्या वापरानं केस सरळ होतातही, पण त्यातला सर्वात मोठा धोका म्हणजे हा उपाय तात्पुरताच ठरतो. एवढा खर्च करून, वेळ देऊन फायदा तर होत नाहीच, उलट केस आणखी खराब होतात, बेजान होतात, केसांचा कोरडेपणा, शुष्कपणा वाढतो आणि त्या केसांची पार रयाच जाते. अनेक तरुणी तर रोज हेअर ड्रेसिंगही करतात. त्यामुळे केसांची आणखीच वाट लागते.
मग करायचं तरी काय? काहीही केलं तरी केसांची रया जाणार, त्यांची अधिकाधिक काळजी घ्यावी लागणार आणि चेहऱ्याचं सौंदर्य.. तेही कमी कमीच होत जाणार.. निदान तसं प्रत्येक तरुणीला वाटतं.
काय सामुग्री लागेल?
१- एक कप नारळाचं दूध
२- अर्धा कप कॉर्न स्टार्च
३- तीन टेबलस्पून आॅलिव्ह आॅईल
४- एक टेबलस्पून लिंबूरस
५- एक टेबलस्पून अॅलोवेरा जेल
६- व्हिटॅमिन ए च्या तीन कॅप्सूल्स
कसं वापराल?
१- एका भांड्यात अगोदर नारळाचं दूध टाका. त्यात कॉर्न स्टार्च टाका. थोडं हलवा आणि मंद आचेवर ठेवा
२- आता त्यात आॅलिव आॅईल, लिंबू रस आणि अॅलोवेरा जेल टाकून ते चांगल्या पद्धतीनं मिक्स करा.
३- आपण व्हिटॅमिन ए च्या ज्या तीन कॅप्सूल्स घेतल्या आहेत, त्या या मिश्रणात टाका आणि हळूहळू ढवळत राहा, जोपर्यंत या साऱ्या मिश्रणाचं क्रीम बनत नाही.
४- हे सारं मिश्रण एका कंटेनरमध्ये टाका.
५- आता हे क्रिम आपल्या केसांवर सावकाश लावा. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हे क्रिम केसांवर वरून खाली अशा पद्धतीनं लावा.
६- आता शॉवर कॅप लावा. काही वेळानंतर शॅम्पूनं केस धुवा.
७- केसांना ब्लो ड्राय करा.
८- झाले तुमचे केस स्ट्रेट!