फोनमध्ये नेटवर्क कमी मिळतंय? वापरा या ट्रिक्स !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 11:23 AM2017-02-02T11:23:07+5:302017-02-02T16:53:07+5:30
दिवसाच्या सुरूवातीपासूनच प्रत्येकाला आपल्या फोनमधील नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागतो. आज आम्ही आपणास अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत...
Next
दिवसाच्या सुरूवातीपासूनच प्रत्येकाला आपल्या फोनमधील नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागतो. आज आम्ही आपणास अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याने आपल्या स्मार्टफोनचे नेटवर्क बूस्ट होईल.
जर आपण आपल्या स्मार्टफोनमधील इंटरनेट स्पीड आणि नेटवर्क कमी मिळण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर खालील ट्रिक्स वापरल्याने नक्कीच आपले समाधान होईल. स्मार्टफोन कितीही महागडा असेल, मात्र जर नेटवर्क चांगले मिळत नसेल, तर एवढा महागडा फोन काहीही कामाचा नसतो. लोक त्याला ठीक करण्यासाठी हवे तेवढे पर्याय अवलंबितात. मात्र कित्येकदा निराशाच मिळते.
खालील ट्रिक्स वापरल्यास आपला फोन बूस्ट होण्यास मदत होईल.
* जर आपला फोन ३ जी वर असेल तर त्याला २ जी वर सेट करा. याने इंटरनेटचा स्पीड थोडा कमी होईल मात्र सिग्नल चांगले पकडले जातील.
* स्मार्टफोनला कव्हर लावल्यानेही सिग्नल कमी येतात. अशावेळी जेव्हाही फोनला सिग्नल कमी येत असतील तेव्हा फोनचे कव्हर काढून टाका.
* सिग्नल विक झाल्याने फोनला काचेच्या ग्लासमध्ये ठेवा. यामुळे नेटवर्क व्यवस्थित मिळेल.
* सिग्नल बूस्टरला इन्स्टॉल करा. यानेही नेटवर्कवर चांगला प्रभाव पडतो. जर एखाद्या जागेवर नेटवर्कची समस्या येत असेल तर दुसºया नंबरवर आपले कॉल डायव्हर्ट करा.
वरील ट्रिक्स वापरल्याने आपल्या फोनच्या नेटवर्कची समस्या दूर होईल.
Also Read : डिजिटल विश्वातील वाढती अस्वस्थता !
: सहा प्रकारे होऊ शकते आॅनलाईन फसवणूक !