​‘लुई वितों’चा डिझायनर बनवणार ‘नाईके’ शूज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2016 03:44 PM2016-07-15T15:44:32+5:302016-07-15T21:14:32+5:30

किम जोन्स आणि ‘नाईके’च्या पार्टनरशिपमुळे पॅकेबलर स्पोर्ट स्टाईल’ कलेक्शन ‘नाईके लॅब वि. किम जोन्स’ निर्मितीस आले.

'Nike' shoes to be made designer of Louis Viton | ​‘लुई वितों’चा डिझायनर बनवणार ‘नाईके’ शूज

​‘लुई वितों’चा डिझायनर बनवणार ‘नाईके’ शूज

Next
शन जगतातील अनोख फ्युजन किम जोन्स आणि ‘नाईके’च्या पार्टनरशिपमुळे पाहायला मिळत आहे. किम हा एलाईट लक्झरी फॅशन ब्रँड ‘लुई वितों’चा मुख्य  डिझायनर तर ‘नाईके’ स्पोर्टस्वेअर ब्रँड. किम लक्झरी कपडे, अ‍ॅसेसरीज डिझाईन करतो तर नाईको खेळाडूंना घाम गाळून मेहनत करण्यासाठी उपयुक्त असे कपडे . दोघांचा संगम वरकरणी अशक्य वाटतो.

२०११ साली जेव्हा किमची ‘लुई वितों’चा मेन्स स्टाईल डिरेक्टर म्हणून निवड करण्यात आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. कारण किमची स्टाईल ही रॅम्पपेक्षा स्ट्रीट स्टाईल जास्त होती. परंतु त्याच्या प्रभावाने आता दोघांमधील फरक हळूहळू कमी होत आहे. म्हणूनच ‘नाईके’ने किमच्या अद्भूत कौशल्याचा उपयोग आणखी क्रिएटिव्ह पद्धतीने करण्यासाठी त्याला शूज डिझाईन करण्यासाठी आमंत्रण दिले.

त्यातून ‘पॅकेबलर स्पोर्ट स्टाईल’ कलेक्शन ‘नाईके लॅब वि. किम जोन्स’ निर्मितीस आले. यामध्ये ‘नाईके एअर झूम’ शूजचे नवे व्हर्जन, विंडरनर जॅकेट आणि इतर स्पोर्टस्वेअरचा सामावेश आहे. आपल्या विस्तृत प्रवसानुभवातून प्रेरित किमने आगामी रिओ आॅलिम्पिकसाठी हे आधुनिक कलेक्शन डिझाईन केले आहे.

NIke Kim Jones Shoes

नाईकेने २१ वर्षांपूर्वी ‘नाईके एअर झूम’ ही स्नीकर शू सिरीज सुरू केली होती. आकार थोडा बदलून, बांधणीसाठी फ्लायनिट, फ्लायवायर असे नवे तंत्रज्ञान वापरून किमने या स्नीकरला नवीन रुप दिले आहे. स्नीकरबरेबरच पाणी अवरोधक  कपड्यापासून विंडरनर जॅकेट, अत्यंत कमी वजनाच्या पँटस्, शॉर्टस्, टी आणि ट्रॅव्हल बॅगसुद्धा त्याने डिझाईन केली आहे.

एवढेच नाही तर आगामी काळात आणखी नवे शूज कलेक्शन तयार करण्याची योजना त्याने बोलून दाखविली आहे. 

Windrunner

Web Title: 'Nike' shoes to be made designer of Louis Viton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.