​स्मार्टफोन शोधणार ‘नो सेल्फी’ झोन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2016 02:33 PM2016-08-13T14:33:24+5:302016-08-13T20:03:24+5:30

स्मार्टफोननेच जर सेल्फीसाठी धोकादाय किंवा बंदी असलेल्या जागा ओळखून आपल्याला त्वरीत सजग केलं तर?

'No selfies' zone to find smartphones | ​स्मार्टफोन शोधणार ‘नो सेल्फी’ झोन

​स्मार्टफोन शोधणार ‘नो सेल्फी’ झोन

Next
ल्फी घेणे आजकाल खूपच घातक बनले आहे. बैलांच्या शर्यती, खोलवर उडी मारणे अथवा पोकेमॉन गो सारख्या खेळातून हे समोर आले आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नुकतेच मुंबई सेल्फी काढण्याच्या नादात काही मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. सेल्फी संदर्भातील अपघातांचे प्रमाण पाहता, भारतामध्ये नो सेल्फी एरिया वाढण्याची शक्यता आहे. 

रेल्वे प्लॅफॉर्म्स, हाय स्पीड ट्रॅफिक कॉरिडॉर या ठिकाणी नो सेल्फी एरिया घोषित करण्यासंदर्भात भारत सरकार विचार करते आहे. याचे कारण म्हणजे कोणतेही ठिकाण आता शाश्वत राहिलेले नाही, ते अधिक प्रमाणात धोकादायक झालेले आहे. छत आणि बाल्कनी यांचा अधिक धोकादायक जागांमध्ये समावेश होतो.

सेल्फीची क्रेझच अशी आहे की, लोकांना कशाचेच भान राहत नाही. विशेष म्हणजे लोक सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सोशल मीडियावर ‘हवा’ करण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे जर लोकांनाच त्यांच्या सुरक्षेची काळजी नसेल तर कमीतकमी तंत्रज्ञानाने तरी ती जबाबदारी घ्यायाला हवी नाही का?

याच विचारातून एक संकल्पना पुढे येत आहे. म्हणजे स्मार्टफोननेच जर सेल्फीसाठी धोकादाय किंवा बंदी असलेल्या जागा ओळखून आपल्याला त्वरीत सजग केलं तर? ‘नो सेल्फी’ झोनमध्ये जर तुम्ही सेल्फी काढण्यासाठी फोन काढला तर आपला फोन तसे आपल्याला सांगेल.  फोनद्वारे कोणते क्षेत्र नो सेल्फी आहे, हे कळू शकते. संशोधक यावर काम करती पण तोपर्यंत धोक्याच्या ठिकाणी मोबाईलचा कॅमेरा बंद ठेवणे योग्य ठरेल. आपण आपलीच काळजी नाही घेणार तर कोण घेणार?

Web Title: 'No selfies' zone to find smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.