‘नोकिया ३३१०’ नव्या अवतारात दाखल, हे आहेत फीचर !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 06:31 AM2017-02-28T06:31:53+5:302017-02-28T12:01:53+5:30

मोबाइलप्रेमींच्या ह्रदयावर राज्य करणाऱ्या ‘नोकिया ३३१०’चे अद्ययावत व्हर्जन केवळ ४९ युरो अर्थात ३,४६८ रुपयांना उपलब्ध होणार आहे.

Nokia 3310 'new avatars, these are features! | ‘नोकिया ३३१०’ नव्या अवतारात दाखल, हे आहेत फीचर !

‘नोकिया ३३१०’ नव्या अवतारात दाखल, हे आहेत फीचर !

Next
ong>-Ravindra More
मोबाइल क्षेत्रात नावाजलेल्या नोकिया कंपनीने आपल्या जुन्या ‘नोकिया ३३१०’ला नव्या अंदाजात बर्सिलोना मोबाइल वर्ल्ड कांग्रेसमध्ये नव्या अवतारात दाखल करण्यात आले. एकेकाळी मोबाइलप्रेमींच्या ह्रदयावर राज्य करणाऱ्या ‘नोकिया ३३१०’चे अद्ययावत व्हर्जन केवळ ४९ युरो अर्थात ३,४६८ रुपयांना उपलब्ध होणार आहे. मात्र हा फोन भारतात उपलब्ध होण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. या हँडसेटचे खास वैशिट्ये म्हणजे पूर्वीच्या फक्त आणि फक्त नोकियाकडेच असणारा लोकप्रिय स्नेक गेमचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

काय आहेत फीचर 
* नोकिया ३३१०ची स्क्रीन २.४ इंची असून, टूजी कनेक्टिव्हीटी देण्यात आली आहे.

* बॅटरी १२०० एमएएचची असून, अंतर्गत स्टोरेज क्षमता १६ जीबीची आहे. मायक्रोएसडी कार्ड वापरून ही क्षमता ३२ जीबीपर्यंत वाढविता येते. ही बॅटरी जुन्या हँडसेटच्या तुलनेत जवळपास दसपट शक्तिशाली आहे.

* या हँडसेटमध्ये वेब ब्राउजिंग करता येणार आहे.

* एलईडी फ्लॅशसह दोन मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

* जुन्या हँडसेटप्रमाणे याचीही बॅटरी काढता येते. नव्या हँडसेटमध्ये बॅटरी चार्ज करण्यासाठी मायक्रोयूएसबीचा अंतर्भाव केला आहे.

* एकदा चार्ज केल्यानंतर हँडसेटवर ५१ तास संगीताचा तर, ३९ तास रेडिओचा आनंद घेता येईल, असा कंपनीचा दावा आहे.

* ‘नोकिया ३३१०’ पुन्हा नव्या आणि आकर्षक स्वरूपात बाजारात सादर करण्याची किमया एचएमडी ग्लोबलने केली आहे. या शिवाय कंपनी लवकरच नोकिया ६, नोकिया ५ आणि नोकिया ३ आदी लोकप्रिय उत्पादनेही सादर करणार आहे.

Web Title: Nokia 3310 'new avatars, these are features!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.