​आता येतेय हॅरी पॉटर लघुकथांचे ई-बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2016 11:59 AM2016-08-19T11:59:59+5:302016-08-19T17:29:59+5:30

पुढील महिन्यात हॅरी पॉटर आणि त्याच्या जादुई दुनियेबद्दल लघुकथांची मालिका ई-बुकच्या स्वरुपात उपलब्ध होणार आहे.

Now comes the Harry Potter short stories e-book | ​आता येतेय हॅरी पॉटर लघुकथांचे ई-बुक

​आता येतेय हॅरी पॉटर लघुकथांचे ई-बुक

Next
ालवृद्धांना अक्षरक्ष: वेड लावलेल्या ‘हॅरी पॉटर’ पुस्तकांच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लेखिका जे. के. रोलिंग यांनी नुकतीच घोषणा केली की, पुढील महिन्यात हॅरी पॉटर आणि त्याच्या जादुई दुनियेबद्दल लघुकथांची मालिका ई-बुकच्या स्वरुपात उपलब्ध होणार आहे.

या  नव्या कथांना पॉटरमोर प्रेझेन्टस्’ असं नाव देण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या लघुकथेचे शीर्षक ‘हॉगवर्टस् : अ‍ॅन इनक म्प्लिट अँड अनरिलायबल गाईड’ असून त्यात जादुई शाळेबद्दलची गुपिते सांगण्यात येणार आहे. तसेच प्रोफेसर स्लघॉर्नच्या भूतकाळाविषयी ‘हॉगवर्टस् आॅफ पॉवर, पॉलिटिकल अँड पेस्की पोल्टरगाईस्ट’मध्ये माहिती मिळेल.

या कथासंग्रहामध्ये रोलिंग यांनी यापूर्वी लिहिलेल्या व काही नव्या कथांचा सामावेश असणार आहे. ६ सप्टेंबर रोजी सर्व लघुकथा उपलब्ध होणार असल्यामुळे हॅरी पॉटर फॅन्सना जास्त वाट पाहावी लागणार नाही. नुकतेच हॅरी पॉटर सीरिजमधील नवे पुस्तक ‘हॅरी पॉटर अँड कर्स्ड चाईल्ड’ प्रकाशित झाले. परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. कदाचित या नव्या कथा पुन्हा एकदा ‘पॉटरमेनिया’ची सुरूवात करण्यास यशस्वी होतील अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे.

Web Title: Now comes the Harry Potter short stories e-book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.