​आता बॅग घेऊन नाही तर बॅगवर बसून प्रवासाला जा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2016 12:38 PM2016-08-09T12:38:09+5:302016-08-09T18:11:17+5:30

ही बॅग म्हणजे तुम्ही ओढत न्यायची नाही तर तिच्यावर बसूनच विमानतळ किंवा रेल्वेस्टेशनवर बसून फिरायचे.

Now do not take a bag, but sit on a bag and travel on a journey! | ​आता बॅग घेऊन नाही तर बॅगवर बसून प्रवासाला जा!

​आता बॅग घेऊन नाही तर बॅगवर बसून प्रवासाला जा!

Next
र्षक वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे खरं आहे. जगातील पहिली मोटराईज्ड स्मार्ट लगेज बॅग म्हणता येईल अशी ‘मोडोबॅग’ कल्पनाशक्तीचा अद्भूत नमुना आहे. ही बॅग म्हणजे तुम्ही ओढत न्यायची नाही तर तिच्यावर बसूनच विमानतळ किंवा रेल्वेस्टेशनवर बसून फिरायचे. पायी चालण्याच्या वेगापेक्षा तिप्पट वेग ही बॅग गाठू शकते. 

शिकागोस्थित स्वयंद्योजक केविन ओ’डोनेल आणि एका इंजिनियरने मिळून ही चालतीफिरती बॅग तयार केली असून यामध्ये लिथियम बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक मोटर आहे. तसेच या बॅगमध्ये ड्यूएल व्हील ब्रेकिंग सिस्टिम, पटकन रिलीज होणारे फूट पेडल्स, लांबणारे टाविंग हँडल्स आणि चार्जिंग स्पॉटदेखील असणार. एवढेच कशाला बॅगमध्ये जीपीएसदेखील आहे ज्यामुळे तिचे लोकेशन ट्रॅक करता येईल. १३ किमी प्रतितास एवढ्या वेगाने ही बॅग धावू शकते.

विशेष म्हणजे मोडोबॅग अमेरिकेच्या ‘ट्रान्सपोर्टेशन सिक्युरेटी अ‍ॅडमिनेस्ट्रेशन’ (टीएसए),‘फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनेस्ट्रेशन’ (एफएए), इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) या संस्थांच्या नियमावलीत पूर्णपणे बसते. त्यामुळे आगामी काही काळात बॅगवर बसून लोक स्कू टरप्रमाणे प्रवास करताना दिसले तर अचंबित होऊ नका. बॅगमध्ये हॉर्नदेखील असायला पाहिजे नाही का?

Web Title: Now do not take a bag, but sit on a bag and travel on a journey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.