आता होणार दरवर्षी ३०० टन सोन्याची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2016 01:08 PM2016-08-31T13:08:44+5:302016-08-31T18:38:44+5:30

संशोधकांनी एक अशी रासायनिक (केमिकल) प्रक्रिया शोधली आहे जी दरवर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील ३०० टन सोनं परत मिळवण्यासाठी कामी येईल.

Now every year 300 tonnes of gold will be saved | आता होणार दरवर्षी ३०० टन सोन्याची बचत

आता होणार दरवर्षी ३०० टन सोन्याची बचत

Next
नं या भूतलावरील सर्वात मौल्यवान धातूपैकी एक आहे. भारतीयांना तर सोन्याचा फारच लळा. पण तुम्हाला माहित आहे का की, सोनं केवळ दागिन्यातच नाही तर आपल्या मोबाईल आणि टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येसुद्धा वापरण्यात येते. संशोधकांनी एक अशी रासायनिक (केमिकल) प्रक्रिया शोधली आहे जी दरवर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील ३०० टन सोनं परत मिळवण्यासाठी कामी येईल.

इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून हे सोनं परत मिळवण्याची जी सध्याची पद्धत आहे, ती अकार्यक्षम आणि आरोग्यसाठी धोकादायक आहे (कारण विषारी रसायन ‘सायनाईड’चा यामध्ये वापर केला जातो). जूने मोबाईल फोन्स, टीव्ही, कंप्युटर अशा ईलेक्ट्रॉनिक कचऱ्यामध्ये जगातील सुमारे सात टक्के सोनं असते. सर्किट बोर्ड बनवण्यासाठीदेखील मुख्य घटक म्हणून सोन्याचा वापर केला जातो.

कोणत्याही विषारी रसायनांचा वापर न करता अधिक कार्यक्षमतेन इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून सोनं परत मिळण्याची सोपी केमिकल प्रक्रिया विकसित करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. यामध्ये अत्यंत क्लिष्ट स्वरुपाची रचना असणारे हे रसायन सोनं पुनर्प्राप्त करते. सर्व प्रथम सर्कि ट बोर्डला सौम्य अ‍ॅसिडमध्ये बुडवल्यावर इतर धातू विरघळून जातात. मग हे नवे रसायन त्यामध्ये टाकून ते केळव सोनं वेगळे करते.

Web Title: Now every year 300 tonnes of gold will be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.