आता ट्विटरवर एडिट करण्याची सुविधा !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2017 03:52 PM2017-01-04T15:52:53+5:302017-01-04T15:59:38+5:30

ट्विटरवर अजून कोणते फिचर्स असावेत? असा यूजर्सकडून आॅनलाईन पोल घेतल्यानंतर मिळालेल्या सुचनांनुसार ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी लवकरच ट्विट (एडिट) संपादित करण्याची सुविधा प्रदान करण्याचे संकेत दिले आहेत.

Now the facility to edit on twitter! | आता ट्विटरवर एडिट करण्याची सुविधा !

आता ट्विटरवर एडिट करण्याची सुविधा !

Next
विटरवर अजून कोणते फिचर्स असावेत? असा यूजर्सकडून आॅनलाईन पोल घेतल्यानंतर मिळालेल्या सुचनांनुसार ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी लवकरच ट्विट (एडिट) संपादित करण्याची सुविधा प्रदान करण्याचे संकेत दिले आहेत.
बऱ्याचदा ट्विट करतांना लगबगीने स्पेलिंगसह अन्य चुका होत असतात. मात्र त्या दुरूस्त करण्यासाठी संपादित (एडिट) करण्याची कोणतीही सुविधा नाही. परिणामी संबंधित ट्विट डिलीट करून नवीन सुधारित ट्विट करण्याशिवाय कोणताही उपाय सध्या नाही. यामुळे एडिटचे फिचर आवश्यक असल्याचे अनेक यूजर्सनी सुचविले. याशिवाय एखादे विशिष्ट महत्वाचे ट्विट ‘बुकमार्क’ करण्याची सुविधादेखील हवी असल्याचे डोर्सी यांनी सुचविण्यात आले. याचसोबत मल्टीपल टाईमलाईन आणि उत्तम दर्जाच्या थ्रेडिंगच्या सूचनादेखील त्यांना करण्यात आल्या. विशेष म्हणजे ट्विटरवर अनेकदा भयंकर पध्दतीने ट्रोलिंग होत असते. याशिवाय द्वेषयुक्त भाषा वापरत एखाद्याला बदनाम करण्यात येते. हे रोखण्यासाठी डोर्सी यांनी प्रयत्न करावेत असेही अनेक यूजर्सनी सुचविले.

 

Web Title: Now the facility to edit on twitter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.