आता फेसबुकद्वारे करा जॉब अ‍ॅप्लिकेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2016 05:26 PM2016-11-08T17:26:48+5:302016-11-08T17:26:48+5:30

प्रतिस्पर्धी ‘लिंक्डइन’ला टक्कर देण्यासाठी फेसबुक ही सुविधा विकसित करणार.

Now get job application by Facebook | आता फेसबुकद्वारे करा जॉब अ‍ॅप्लिकेशन

आता फेसबुकद्वारे करा जॉब अ‍ॅप्लिकेशन

Next
िकाधिक यूजर्स आकर्षित करण्यासाठी सोशल मीडिया कंपनी ‘फेसबुक’ सतत काही तरी नवीन करीत असते. वाढती आॅनलाईन स्पर्धा पाहता कंपनी धोरणांमध्ये बदल करत वैविध्यपूर्ण फीचर्स इंट्राड्यूस करत आहे. याचे लेटेस्ट उदाहरण म्हणजे लवकरच तुम्ही फेसबुकद्वारे उमेदवारांचे रेझ्युमे स्विकारू शकणार.

या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी ‘लिंक्डइन’ला टक्कर देण्यासाठी फेसबुक ही सुविधा विकसित करणार असून ज्याद्वारे कंपन्या त्यांच्या एफबी पेजवर जॉब ओपनिंगची माहिती टाकू शकतात आणि तेथेच इच्छुक उमेदवारांचे अ‍ॅप्लिकेशन्स स्विकारू शकतील.

कपंनीच्या प्रवक्त्याने माहिती दिली की, फेसबुक यूजर्सचे अध्ययन केले असता आमच्या असे लक्षात आले की, अनेक छोटे व्यवसायिक/कंपन्या त्यांच्या पेजवर जॉब ओपनिंगबद्दल पोस्ट करतात. हे लक्षात घेता मग आम्ही असे फीचर देऊ इच्छितो की, एफबी पेजवरच उमेदवार प्रॉपर अ‍ॅप्लिकेशन देऊ शकतो आणि ती कं पनीला मिळेल. पेज अ‍ॅडमिनला जॉब पोस्टिंग आणि अर्ज स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार.’

‘लिंक्डइन’चा बहुतांश महसुल अशा प्रकारेच येतो. मग आपण का नाही फे सबुकलाच ही सुविधा देत? असा विचार करून कंपनी कामाला लागली आहे. या नव्या फीचरमुळे कंपनीच्या एफबी पेजकडे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढेल. फेसबुकला पैसे देऊन ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जॉब ओपनिंगची माहिती पसरवू शकतील.

                                  

सध्या तरी ही प्रक्रिया विकासाच्या टप्प्यात आहे. लवकरच याविषयी अधिक माहिती जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात कंपनीने ‘मार्केटप्लेस’ नावाचे फीचर लाँच केले होते. स्थानिक पातळीवरील वस्तू खरेदी आणि विक्री करण्याची सुविधा याद्वारे देण्यात आली आहे.

सोशल नेटवर्किंग म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर फेसबुकची नजर आता एम्लॉयमेंट नेटवर्किंगवर आहे असेच म्हणावे लागेल. शंभर कोटींपेक्षा जास्त सक्रीय यूजर्स असणाऱ्या फेसबुकसमोर बदलत्या काळात ट्रेंडनुसार अपडेट होण्याचे मोठे आव्हान आहे. इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटला तरुणांचा मिळणारा उदंड प्रतिसाद कंपनीसाठी धोक्याची घंटा आहे.

नवीन यूजर्स जोडण्यात अपयश आल्यामुळे काय होते याचे आदर्श उदहारण म्हणजे ‘ट्विटर’. तशी अवस्था होऊ नये म्हणून कंपनी अशा प्रकारे नवीन यूजर्सना आकर्षित करीत आहे.

Web Title: Now get job application by Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.