आता कारमध्येसुद्धा गोरील्ला ग्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:08 AM2016-01-16T01:08:59+5:302016-01-31T11:27:39+5:30

कॉर्निंग कंपनीने तयार केलेला गोरील्ला ग्लास जगभरातील अब्जाबधी स्मार्टफोन्समध्ये वापरण्यात येतो. मात...

Now Gorilla glass in the car | आता कारमध्येसुद्धा गोरील्ला ग्लास

आता कारमध्येसुद्धा गोरील्ला ग्लास

Next
र्निंग कंपनीने तयार केलेला गोरील्ला ग्लास जगभरातील अब्जाबधी स्मार्टफोन्समध्ये वापरण्यात येतो. मात्र आता केवळ मोबाईलच नाही तर कारमध्येसुद्धा त्याचा वापर सुरू झाला आहे. अनेक कार कंपन्या आपल्या गाड्यांचे वजन कमी करण्यासाठी गोरील्ला ग्लास वापरत आहेत. सर्वप्रथम 'बीएमडब्ल्यू'ने गेल्या वर्षी त्यांच्या एजी मॉडेल आय-८ हायब्रिड स्पोर्ट्स कारच्य इंटेरिअर पॅनलमध्ये याचा वापर केला.
पुढील वर्षी बाजारात येणार्‍या फोर्ड जीटी या स्पोर्ट्स कारचा समोरचा व मागचा काच आणि इंजिन कव्हरसाठी गोरील्ला ग्लास वापरण्यात आला आहे. कंपनीचे पॉल लिन्डेन यांनी माहिती दिली की, कंपनीच्या इतिहासामध्ये प्रथमच अशा प्रकारचा काच वापरण्यात येणार आहे. १९२३ साली कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांनी मॉडेल टी कारमध्ये श्ॉटर प्रतिरोधक काच लावला होता.
गोरील्ला ग्लास पारंपरिक काचेच्या तुलनेत वजनाने फार हलका असतो. गोरील्ला ग्लासपासून बनवलेल्या कारचे विंडशिल्ड हे सामान्य काचेपासून बनविलेल्य विंडशिल्डपेक्षा ३२ टक्के जास्त हलके असते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात इंधन बचत होते. अमेरिकेतील सर्व सुरक्षा मानकांवर हा गोरील्ला ग्लास खरा उतरला असून आगामी काळात याचा वापर वाढणार आहे.

Web Title: Now Gorilla glass in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.