आता एकाच स्मार्टफोनवर चालवा ४ व्हॉट्स अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2016 04:52 PM2016-11-20T16:52:57+5:302016-11-20T16:52:57+5:30

टेक्नॉलॉजीच्या युगात सध्या व्हॉट्स अ‍ॅप सर्वचजण करताना दिसत आहेत. व्हॉट्स अ‍ॅप देखील दिवसेंदिवस त्यात नवनवीन बदल करुन आपल्या यूजर्सना नेहमी अपडेट ठेवत आहे. आपण एका स्माटॅफोनमध्ये २ व्हॉट्स अ‍ॅपच्या बाबतीत ऐकले असेलच,

Now run on a single smartphone 4 Whatsapp app | आता एकाच स्मार्टफोनवर चालवा ४ व्हॉट्स अ‍ॅप

आता एकाच स्मार्टफोनवर चालवा ४ व्हॉट्स अ‍ॅप

Next
क्नॉलॉजीच्या युगात सध्या व्हॉट्स अ‍ॅप सर्वचजण करताना दिसत आहेत. व्हॉट्स अ‍ॅप देखील दिवसेंदिवस त्यात नवनवीन बदल करुन आपल्या यूजर्सना नेहमी अपडेट ठेवत आहे. आपण एका स्माटॅफोनमध्ये २ व्हॉट्स अ‍ॅपच्या बाबतीत ऐकले असेलच, मात्र आता एकाच स्माटॅफोनमध्ये ४ व्हॉट्स अ‍ॅपदेखील चालवू शकणार हे आता शक्य झाले आहे. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सीमकार्डचीदेखील गरज नाही. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण एकाच स्मार्टफोन मध्ये ४ व्हॉट्स अ‍ॅप चालवू शकणार. यासाठी खालील टिप्स फॉलो करा...

स्टेप नंबर-1: 
यासाठी आपणास सर्वप्रथम  GB Whatsapp  नावाचे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. लक्षात घ्या की, हे अ‍ॅप आपणास प्लेस्टोरमध्ये मिळणार नाही , मात्र या अ‍ॅपची Apk फाइल आपणास गुगलवर सहज मिळेल. यासाठी आपण Jktricks च्या वेबसाइट वर जाऊ शकता जिथे आपणास  GB Whatsapp ची Apk फाइल मिळेल. 

स्टेप नंबर-2:
त्या Apk फाइलला डाउनलोड केल्यानंतर जेव्हा आपण इन्स्टॉल करता आपणास एक   Unknown source-error दाखवेल.  मात्र याची काळजी न करता आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन Unknown source  वर टॅप करा. यानंतर आपण Apk फाइल इंस्टॉल करु शकता. 

स्टेप नंबर-3:
त्यानंतर व्हॉट्स अ‍ॅप सेट करण्याची प्रक्रिया सुरू होईल. Apk फाइल ओपन केल्यानंतर आपणास मोबाइल नंबर एंटर करण्याचे सांगितले जाईल. यात आपण कोणताही नंबर एंटर करु शकता. नंबर एंटर केल्यानंतर लगेच आपल्या स्मार्टफोनमध्ये ४ व्हॉट्स अ‍ॅप अकाउंट सेट होतील. 

Web Title: Now run on a single smartphone 4 Whatsapp app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.