आता स्मार्टफोनद्वारे करा स्कॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 04:07 PM2016-11-25T16:07:28+5:302016-11-25T16:07:28+5:30

बऱ्याचदा आपल्या जवळच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रत काढण्यासाठी झेरॉक्स काढणे, डिजिटल स्वरूपात असलेल्या कागदपत्रांची प्रत मिळवण्यासाठी त्याची प्रिंट काढणे आणि कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी आपण ती स्कॅन करून ठेवतो....

Now scan through Smartphone | आता स्मार्टफोनद्वारे करा स्कॅन

आता स्मार्टफोनद्वारे करा स्कॅन

Next
्याचदा आपल्या जवळच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रत काढण्यासाठी झेरॉक्स काढणे, डिजिटल स्वरूपात असलेल्या कागदपत्रांची प्रत मिळवण्यासाठी त्याची प्रिंट काढणे आणि कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी आपण ती स्कॅन करून ठेवतो. कारण आपल्यापैकी प्रत्येकाला या गोष्टी करण्याची गरज कधी ना कधी खरं तर सततच पडत असते. आता यापैकी महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करण्याचे काम तुम्ही घरच्या घरी संपूर्ण विनामूल्य ‘मायक्रोसॉफ्टच्या आॅफिस लेन्स’ या अ‍ॅपच्या सहाय्याने स्मार्टफोनद्वारे करू शकता, म्हणजेच त्यासाठी तुम्हाला घरी स्कॅनर असण्याची आवश्यकता नाही. 
मायक्रोसॉफ्ट आॅफिस लेन्स अ‍ॅपद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट जसे की, हस्तलिखित किंवा प्रिंटेड डॉक्युमेंट, बिझनेस कार्ड इत्यादीची डिजिटल कॉपी बनवू शकता. तसेच तुमच्या हस्ताक्षरात ब्लॅक बोर्ड किंवा व्हाइट बोर्डवर नमूद केलेले मुद्दे तसेच काही इमेजेसदेखील स्कॅन करु शकतात. स्कॅन करण्यासाठी आपल्याला केवळ एक फोटो काढावा लागतो. तुम्ही डॉक्युमेंटचा फोटो घेतल्यावर हे अ‍ॅप त्या डॉक्यूमेंटच्या मुख्य कडा आणि शिरोबिंदू ओळखते. इतर अनावश्यक भाग काढून टाकून केवळ मुख्य डॉक्यूमेंटचा फोटो ठळकपणे दर्शवते. तुम्हाला डिजिटल रूपात काय रूपांतरित करायचे आहे, त्यानुसार कुठला मोड निवडायचा हे तुम्ही ठरवू शकता. व्हाइटबोर्ड मोडमध्ये तुम्ही व्हाइटबोर्डचा फोटो काढल्यावर अनावश्यक भाग ट्रीम करू शकता. या मोडमधे बोर्डवरील चकाकी आणि सावली स्कॅन केल्यावर काढून टाकता येते. डॉक्यूमेंट मोडमधे अनावश्यक भाग ट्रीम करण्याबरोबरच अक्षरे आणि रंगीत चित्र अतिशय सुस्पष्टपणे स्कॅन केली जातात. जर तुम्ही प्रिंटेड टेक्स्ट असलेले डॉक्यूमेंट स्कॅन केलेले असेल तर फोटोतील अक्षरे ओसीआर म्हणजेच आॅप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे ओळखली जातात. त्यामुळे तुम्ही या फोटोतील शब्द शोधू शकता. ते कॉपी करू शकता. तसेच त्या डॉक्यूमेंटमध्ये बदल देखील करता येतात.

Web Title: Now scan through Smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.