आता स्मार्टफोनमध्ये प्रादेशिक भाषा असणे बंधनकारक !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2016 04:49 PM2016-11-04T16:49:04+5:302016-11-04T16:49:04+5:30
ई-कॉमर्सला चालना मिळावी तसेच इंग्रजी भाषा न येणाऱ्या भारतीयांना मोबाईलचा वापर करणे सोईस्कर व्हावे यासाठी इंडियन स्टँडर्ड अॅक्टच्या १०(१) कायद्यानुसार भारतात विक्री होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये भारतातील भाषांचा समावेश करणे अनिवार्य असणार आहे.
Next
ई- कॉमर्सला चालना मिळावी तसेच इंग्रजी भाषा न येणाऱ्या भारतीयांना मोबाईलचा वापर करणे सोईस्कर व्हावे यासाठी इंडियन स्टँडर्ड अॅक्टच्या १०(१) कायद्यानुसार भारतात विक्री होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये भारतातील भाषांचा समावेश करणे अनिवार्य असणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. येत्या १ जुलै २०१७ पासून आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
सरकारच्या या नवीन नियमानुसार आता प्रत्येक मोबाईल कंपन्यांना स्मार्टफोनमध्ये मजकूर वाचण्यासाठी भारतीय भाषांचा सपोर्ट द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता यूजर्सना मेसेज वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी इंग्रजी, हिंदी व अन्य प्रादेशिक भाषांचा पर्याय उपल्बध असणार आहे.