​आता इंटरनेट शिवाय वापरा फेसबुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2016 04:34 PM2016-12-27T16:34:02+5:302016-12-27T16:36:25+5:30

शीर्षक वाचून आश्चर्य वाटले असेल! मात्र, हे तेवढेच खरे आहे. फेसबुक आता तुम्ही इंटरनेट शिवाय सहज वापरू शकता. फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्यासारख्या अनेक गोष्टी तुम्ही इंटरनेट शिवाय करु शकता.

Now use Facebook without internet! | ​आता इंटरनेट शिवाय वापरा फेसबुक!

​आता इंटरनेट शिवाय वापरा फेसबुक!

Next
र्षक वाचून आश्चर्य वाटले असेल! मात्र, हे तेवढेच खरे आहे. फेसबुक आता तुम्ही इंटरनेट शिवाय सहज वापरू शकता. फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्यासारख्या अनेक गोष्टी तुम्ही इंटरनेट शिवाय करु शकता. बऱ्याचदा इंटरनेटची गती कमी असल्याने किंवा डाटा संपल्यास आपण फेसबुक वापरू शकत नाही. अशा वेळी नव्या ट्रिकनुसार फक्त आपल्या मोबाइलवर *३२५# डायल करुन फेसबुकचा वापर करु शकता. हा नंबर डायल केल्यानंतर तुमच्या फोन स्क्रीन वर रिक्वेस्ट प्रोसेस होत असल्याचा मेसेज येईल. त्यानंतर काही सेकंदांनी फोन स्क्रीनवर फेसबुकचा मेसेज दिसेल. यात खालील पर्याय दिसतील.
-फेसबुक लॉगिन
-न्यूज फ्लॅश
-व्हाट्स हॉट
-बॉलिवूड टुडे
यापैकी एक पर्याय टाईप करा व सेंड करा. त्यानंतर आपली फेसबुक लॉगिन आयडी टाईप करा व सेंड करा. 
यानंतर फेसबुक पासवर्डचा पर्याय येईल. त्यात फेसबुक पासवर्ड टाईप करुन सेंड करा. 
त्यानंतर तुम्हाला खालील पर्याय दिसतील.
-फेसबुक लॉगिन
-न्यूज फ्लॅश
-व्हाट्स हॉट
-डिल्स २ यू
-बॉलिवूड टुडे
-अपडेट स्टेटस्
-आॅफलाईन फ्रेंडस्
-फ्रेंड्स रिक्वेस्ट
-अकाऊंट सेटिंग
वरीलपैकी आपणास हव्या त्या पर्यायाचा क्रमांक टाईप करुन सेंड करा. यानंतर एक सबस्क्रिप्शन मेसेज येईल. फेसबुकच्या या आॅफलाईन फिचरचा उपयोग करण्यासाठी महिन्याला ३० रुपये द्यावे लागतील. सबस्क्राईब केल्यावर कुठेही विना इंटरनेट तुम्ही फेसबुक वापरु शकता. 

टीप: एयरटेल, एयरसेल, टाटा डोकोमो व आयडिया मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: Now use Facebook without internet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.