आता ‘व्हॉट्स अॅप’ वापरा विना इंटरनेट !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2016 03:07 PM2016-10-19T15:07:45+5:302016-10-19T15:12:58+5:30
बदलत्या जीवनशैलीत सध्या व्हॉट्स अॅप प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनला आहे.
Next
ब लत्या जीवनशैलीत सध्या व्हॉट्स अॅप प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनला आहे. एक दिवसही कोणी लांब राहू शकत नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान-सहान गोष्टही अगोदर आपण व्हॉट्स अॅपवर शेअर करतो. एवढे महत्त्व आपल्या आयुष्यात आपण व्हॉट्स अॅपला देतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्स अॅपला इंटरनेटशिवाय वापरताच येणार नाही. मात्र बदलत्या टेक्नॉलॉजीने यावरही पर्याय शोधून काढला असून, आता विना इंटरनेट आपण व्हॅट्स अॅप वापरु शकता. कसे ते जाणून घ्या...
सर्वप्रथम तुम्हाला यासाठी फक्त एक चॅट सीम विकत घ्यावे लागेल. ते एक सीमकार्डच आहे. याद्वारे तुम्ही कधीही खंड न पडता व्हॉट्स अॅप वापरु शकाल. विशेष म्हणजे यासाठी आपल्या मोबाईलमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही. हे एकमेव असे सीमकार्ड आहे की, इंटरनेट कनेक्शन शिवाय व्हॉट्सअॅपबरोबरच व्हीचॅट, मेसेंजर आणि हाईक यासारखे मॅसेजिंग अॅप वापरता येतात. हे चॅटसीम सुमारे १५० देशांमध्ये काम करते. तसेच यासाठी एक्स्ट्रा चार्ज देखील द्यावा लागत नाही. एकदा सीम घेतले की त्यानंतर खर्च येत नाही. याची किंमत सुमारे १० युरो असून ते भारतातही उपलब्ध आहे. भारतात याची किंमत सुमारे ९०० रुपये आहे. याची खरेदी अधिकृत वेबसाईटवरुन करु शकतो. त्यानंतर वेबसाईटवरुनच अॅक्टिव्ह करता येईल. त्यानंतर लगेच याचा वापर करता येईल. ग्रामीण भागात किंवा प्रवासादरम्यान बहुतेक इंटरनेटची रेंज मिळत नाही. अशावेळी चॅट सीम फायद्याचे ठरुन आपण व्हॉट्स अॅप वापरू शकतो.