​आता तुमचेसुद्धा ट्विटर अकाउंट होऊ शकते ‘व्हेरिफाईड’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2016 09:10 AM2016-07-24T09:10:54+5:302016-07-24T14:42:13+5:30

आपण सर्व आता तो ‘निळा टिक’ मिळवण्यासाठी कंपनीला विनंती करू शकतो.

Now you can get Twitter account too 'VeriWide' | ​आता तुमचेसुद्धा ट्विटर अकाउंट होऊ शकते ‘व्हेरिफाईड’

​आता तुमचेसुद्धा ट्विटर अकाउंट होऊ शकते ‘व्हेरिफाईड’

Next
विटर वापरणाऱ्या बहुतेक प्रत्येकाचेच एक स्वप्न असेल. ते स्वप्न म्हणजे आपल्या ट्विटर अकाउंटमध्ये तो ‘निळा टिक’ मार्क असावा. हा ‘निळा टिक’ मार्क असणारे अकाउंट हे व्हेरिफाईड असतात. म्हणजे ट्विटर स्वत: शहानिशा करून ते अकाउंट त्या व्यक्तीचेच आहे याची खात्री करते. आतापर्यंत केवळ सेलिब्रेटी आणि प्रसिद्ध लोकांचेच आकउंट व्हेरिफाईड  केले जात असत.

परंतु आता प्रत्येक ट्विटर यूजर व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करू शकतो. म्हणजे आपण सर्व आता तो ‘निळा टिक’ मिळवण्यासाठी कंपनीला विनंती करू शकतो. त्यासाठी कंपनीने एक वेगळे अ‍ॅप्लिकेशन पेज बनवले असून तेथे जाऊन यूजर्स ट्विटरद्वारे अधिकृत व्हेरिफिकेशन करण्यासाठी अर्ज करू शकतात. मात्र, विशिष्ट निकषांची पूर्ती केल्यावर व्हेरिफाईड यूजर म्हणून दर्जा मिळेल.

त्यासाठी तुम्हाला तुमचा खरा मोबाईल क्रमांक, ईमेल, स्वत:द्दल सत्य माहिती, वाढदिवस, प्रोफाईल आणि हेडर फोटोज्, एक वेबसाईट आणि  ट्विट्स ‘पब्लिक’साठी केलेले असणे अशी माहिती सादर करणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्ही ‘व्हेरिफाईड’ होण्यासाठी का म्हणून पात्र आहात याची कारणे आणि इतर अनेक पडताळणी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. कंपनीच्या उपाध्यक्ष टिना भटनागर यांनी सांगितले की, यूजर्सना ट्विटरवर प्रभावशील लोक शोधणे सोपे जावे या उद्देशना आम्ही हा निर्णय घेतला आहे.

पूर्वी ट्विटर कॉम्युनिटीवर पुरेसा प्रभाव असणाऱ्या यूजर्सना कंपनी स्वत: संपर्क साधून सर्व पडताळणी प्रक्रिया पूर्ण करत असे. संगीत, अभिनय, फॅशन, प्रशासन, राजकारण, धर्म, पत्रकारिता, मीडिया, खेळ, व्यापार आणि इतर प्रमुख क्षेत्राततील प्रभावशाली व्यक्तींचाच ढोबळ मानाने यात सामावेश केला जात असे.

आपल्या नियमांमध्ये अमुलाग्र बदल करण्याचे धोरण कंपनीने अलिकडच्या काळात स्वीकारले आहे. मोठ्या लांबीचे व्हिडियो, १४० कॅरेक्टर्स अट वाढवणे अशा बदलांचाच पुढचा भाग म्हणून व्हेरिफि केशन प्रक्रिया सर्वांसाठी खुली करण्याच्या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

Web Title: Now you can get Twitter account too 'VeriWide'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.