राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 08:03 AM2017-02-28T08:03:28+5:302017-02-28T13:33:28+5:30

दि.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी चंद्रशेखर वेंकटरमण यांनी प्रकाशाचे विवरण व त्याचा परिणाम याचा शोध लावला. त्यांच्या कार्याची आठवण व प्रेरणा म्हणून भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून पाळला जातो.

On the occasion of National Science Day ...! | राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त...!

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त...!

googlenewsNext
.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी चंद्रशेखर वेंकटरमण ( C.V.Raman) या भारतीय शास्रज्ञाने प्रकाशाचे विवरण व त्याचा परिणाम याचा शोध लावला.या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये आल्फेड नोबेल ( डायनामाईटचा बादशहा,स्विडन) पुरस्कार मिळाला.त्यांचा शोध ' रामण इफेक्ट' म्हणून प्रसिद्ध आहे.त्यांच्या कार्याची आठवण व प्रेरणा म्हणून भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून पाळला जातो.

भारतातील काही विज्ञान विश्वरत्ने यांनी, भारतास जगातील वैज्ञानिक  देशांच्या प्रगतिपुस्तकाच्या  पंक्तीत नेऊन ठेवले आहे.

१) डॉ हरगोविंद खुराणा
२) डॉ सुब्रमन्यम चंद्रशेखर
३) डॉ भाभा
४) विक्रम साराभाई
५) डॉ जगदिशचंद्र बोस
६) डॉ ए.पी.जे अब्दूल कलाम
७) डॉ जयंत नारळीकर

   वरील विश्वरत्नांना भारताचे ७ वैज्ञानिक आश्चर्य म्हटले तरी चालेल !

   वरील वैज्ञानिकांनी मानसिक विकासाला मनोविज्ञान व वैचारीक विकासासाठी, विचारांना वैज्ञानिक दृष्टीकोन हवा ? हे त्यांनी त्यांच्या कार्यातुन सिद्ध केलल आहे .म्हणूनच ते GREAT आश्चर्य बनलेत.
    मन हे सर्व गोष्टींचे उगमस्थान आहे.मनात उत्पन्न झालेल्या चांगल्या हेतूमुळे चांगली कृती घडते,तर वाईट हेतुंमुळे वाटाेळे होते.असे जागतिक स्वयंप्रकाशित महामानव सिद्धार्थ गौतम या मनोवैज्ञानिक महामानवाने फार वर्षापूर्वी सांगितले आहे.ते असेही म्हणतात की एखादी परंपरागत गोष्ट चालत आहे म्हणून किंवा ती पुस्तकरूपी ग्रंथात दिलेली आहे म्हणून किंवा ती ऐकावयास चांगली वाटते म्हणून स्विकारू नका.जेव्हा स्वानुभवाने आढळेल तेव्हा ती गोष्ट टाकून द्या, आणि जेव्हा ती गोष्ट तुमच्या व सर्वांच्या हिताची आहे असे स्वानुभवाने आढळेल तेव्हा ती गोष्ट स्विकारल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही.एखादा विचार स्विकारण्यापूर्वी त्यास पडताळून पहाण्याचे स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्यदेवतेने बहाल केले आहे.तात्पर्य असे की नागरीकांनी शोधक बुद्धी व वैज्ञानिक दृष्टीकोन यांची जोपासना केली पाहिजे म्हणूनच तर विज्ञान दिनाला महत्व आहे.राष्ट्राची ताकद हि वैज्ञानिक प्रगतीमुळेच दिसून येते .जेथे वैज्ञानिक प्रगतीची अधोगती असेल तेथे एक बाजु लंगडीच असते.
म्हणून अंधश्रद्धा ,अज्ञान,भेदभाव मानणार्या व वैज्ञानिक दृष्टीकोन - मनोविज्ञान मानणार्या सर्व भारतीय व जागतिक बांधवांना विज्ञान दिवसाच्या वैज्ञानिक शुभेच्छा !!!

Web Title: On the occasion of National Science Day ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.