​सात वर्षांच्या मुलीने शोधून दिले आॅलिम्पिक गोल्ड मेडल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2016 01:11 PM2016-08-31T13:11:50+5:302016-08-31T18:41:50+5:30

त्याने स्वत: सात वर्षीय क्लोच्या शाळेत जाऊन वर्गमित्रांसमोर तिचे अभिनंदन केले.

The Olympic gold medal was discovered by a seven-year-old girl | ​सात वर्षांच्या मुलीने शोधून दिले आॅलिम्पिक गोल्ड मेडल

​सात वर्षांच्या मुलीने शोधून दिले आॅलिम्पिक गोल्ड मेडल

Next
कतेच पार पडलेल्या ‘रिओ आॅलिम्पिक’ स्पर्धेचा ज्वर ओसरण्याचे काही नाव घेत नाहीए. क्रिकेट, फुटबॉल व्यतिरिक्तही अनेक खेळांत चुरस असते, देशाची प्रतिष्ठा उंचावण्याची ती संधी असते हे अनेक जणांना कळाले. आॅलिम्पिक गोल्ड मेडल किती अनमोल असते हे काही वेगळे सांगायला नको.

अन् जर हे गोल्ड मेडल हरवले किंवा चोरी गेले तर? जो जेकोबी या आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूच्या कारमधून गेल्या जून महिन्यात गोल्ड मेडल चोरी गेले होते. कनोई डबल स्लॅलोम खेळामध्ये १९९२ बार्सिलोना आॅलिम्पिक स्पर्धेत जोने हे पदक जिंकले होते.

काही आठवड्यांनंतर क्लो स्मिथ आपल्या वडिलांसोबत रस्त्याने जात असताना तिला कचऱ्यामध्ये काही तरी चकाकणारी वस्तू दिसली. जवळ जाऊन पाहिले तर ती वस्तू म्हणजे जोचे गोल्ड मेडल होते. क्लोने मग ते पदक जेकोबीला परत केले. जेकोबीने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली.

एवढेच नाही तर त्याने स्वत: सात वर्षीय क्लोच्या शाळेत जाऊन वर्गमित्रांसमोर तिचे अभिनंदन केले. वर्गातील विद्यार्थ्यांसमोर त्याने क्लोच्या आदर्श वर्तणूकीचे कौतुक करताना सर्वांनी तिचा आदर्श घेतला पाहिजे.

Web Title: The Olympic gold medal was discovered by a seven-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.