OMG : आपणही मुलांसमोर ‘किस’ करता का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2017 11:52 AM2017-04-11T11:52:23+5:302017-04-11T17:22:23+5:30
बऱ्याचदा आपण भावनेच्या भरात असे काही वागतो जे मुलांच्या दृष्टीने योग्य नसते. त्यातला एक प्रकार म्हणजे ‘किस’ करणे होय.
Next
आपण घरात काय वागतोय याचा परिणाम आपल्या मुलांवर होत असतो. बऱ्याचदा आपण भावनेच्या भरात असे काही वागतो जे मुलांच्या दृष्टीने योग्य नसते. त्यातला एक प्रकार म्हणजे ‘किस’ करणे होय. मुलांसमोर पती-पत्नी एकमेकांना किस करत असतील तर त्याचे विविध परिणाम मुलांवर होऊ शकतात. यामुळे मुलांना असे वाटू शकते की तुम्ही त्यांच्या आईवर प्रेम करता. सोबतच तुम्ही त्यांच्यावरही प्रेम करता. मात्र किस करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आई-वडील मुलांसमोर साधे किस करू शकतात. परंतु तुमचे ओठ एकमेकांना स्पर्श करत असतील ते जरा विभत्सच असेल.
प्रायव्हसी बाळगा
मान्य आहे की, पती-पत्नीचे नाते खूपच सुंदर असते. नाते जपण्यासाठी, जवळीकता साधण्यासाठी आपण एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा. मात्र मुलांसमोर तुम्ही जर सतत किस किंवा हग करीत असाल तर याचा परिणाम मुलांवर झाल्याशिवाय राहणार नाही.
कामुकतेवर नियंत्रण असावे
बऱ्याचदा किस करताना पती-पत्नी आपल्या सीमा विसरुन जातात आणि त्यांच्यात कामवासना जागृत होते. अशावेळी मुले आपल्याकडे बघत आहेत याचेदेखील भान ते विसरून जातात. म्हणून आई-वडीलांनी मुलांसमोर किस करू नये.
मुले सीमा विसरतात
मुले आपल्या पालकांना किस करताना बघतात, तेव्हा त्यांना असे वाटते की तेसुद्धा कधीही कोणालाही किस करू शकतात. यामुळे मुले आपल्या सीमा विसरतात. म्हणून पालकांनी मुलांसमोर किस करू नये.