OMG : ​प्रत्येक पुरुष लपवितात आपल्या पत्नीपासून ‘या’ गोष्टी !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 06:46 AM2017-02-16T06:46:04+5:302017-02-16T12:17:46+5:30

कोणताही पुरुष आपल्या पत्नीवर कितीही प्रेम करीत असेल, मात्र काही गोष्टी अशा असतात ज्या तो आपल्या पत्नीला कदापी सांगत नाही. मग काय असतात नेमक्या त्या गोष्टी याबाबत जाणून घेऊया.

OMG: Every man hides his 'things' from his wife! | OMG : ​प्रत्येक पुरुष लपवितात आपल्या पत्नीपासून ‘या’ गोष्टी !

OMG : ​प्रत्येक पुरुष लपवितात आपल्या पत्नीपासून ‘या’ गोष्टी !

googlenewsNext
ong>-Ravindra More

कोणताही पुरुष आपल्या पत्नीवर कितीही प्रेम करीत असेल, मात्र काही गोष्टी अशा असतात ज्या तो आपल्या पत्नीला कदापी सांगत नाही. मग काय असतात नेमक्या त्या गोष्टी याबाबत जाणून घेऊया.

* बहुतेक पुरुष महिला ड्रायव्हरला घाबरतात. त्यांना असे वाटते की, महिला ड्रायव्हिंगच्या बाबतीत शून्य असतात. ते कितीही सांगत असतील की त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, मात्र त्यांच्या भीतिला ते स्वत:पासून लांब करु शकत नाही. 

* कोणत्याही पुरुषाला आपल्या पार्टनरचे एखाद्या सेलिब्रिटी क्रश सोबत वेळ घालविणे अजिबात आवडत नाही, त्याला आपल्या पार्टनरचा या व्यवहारामुळे खूप त्रास होतो मात्र तो ही गोष्ट कोणालाच सांगू शकत नाही.

* प्रत्येकाच्या आयुष्यात दु:खाचे प्रसंग येतात ज्यात त्याची रडण्याची इच्छा होते. पुरुषही रडतात मात्र तो कुणा समोर हे जाहीर करु शकत नाही. या परिस्थितीला तो महिलांपेक्षा चांगल्या कौशल्याने लपवू शकतो. 

* जो मुलगा एखाद्या मुलीवर जीवापाड प्रेम करीत असेल तर तो तिचे सोशल मीडिया प्रोफाइल आणि त्यावरील अपडेट्स नियमित चेक करतो. एवढेच नव्हे तर जे पुरुष विवाहीत असतात ते देखील आपल्या पार्टनरची प्रोफाइल चेक  करतात. मात्र त्यांच्या पार्टनरला असे वाटू नये की तो तिच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करतोय यासाठी ही गोष्ट देखील तो कुणाकडे जाहिर होऊ देत नाही. 

* प्रत्येक पुरुषाला असे वाटते की, त्याची प्रंशसा त्याच्या पार्टनरने करावी. मात्र ही गोष्ट तो कधी तिला सांगू शकत नाही. काही पुरुष आपल्या रिलेशनशिपच्या बाबतीत असुरक्षित फिल करतात आणि त्यांची इच्छा असते की, त्याला त्याच्या पार्टनरने सांगावे की, ती नेहमी त्याचीच राहील. आपण कसे दिसतो याबाबतही तिचे मत जाणून घेण्याची त्याची अपेक्षा असते, मात्र तो स्पष्ट सांगू शकत नाही.

Web Title: OMG: Every man hides his 'things' from his wife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.