OMG : गूगल आपल्याबाबतची ‘ही’ सर्व माहिती साठवून ठेवतोय !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 07:07 AM2017-03-19T07:07:12+5:302017-03-19T12:38:02+5:30

आपण youtube वर कोणता video कधी पहिला, शिवाय Google वर काय काय आणि कधी Search केले याची तंतोतंत माहिती Google साठवून ठेवतोय...

OMG: Google is storing all this 'information' about you! | OMG : गूगल आपल्याबाबतची ‘ही’ सर्व माहिती साठवून ठेवतोय !

OMG : गूगल आपल्याबाबतची ‘ही’ सर्व माहिती साठवून ठेवतोय !

Next
ong>-Ravindra More 

आपण रोज गूगलच्या कित्येक वेब सेवांचा प्रयोग करतो, जसे गूगल सर्च, गूगल क्रोम ब्राउजर, गूगल मॅप, यूट्यूब, अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईल आॅपरेटिंग सिस्टम, हिंदी कीबोर्ड आदी. या सेवांचा प्रयोग करताना गूगल आपल्याबाबतची बरीच माहिती आणि सूचना जाणून घेतो आणि एकत्रित करुन ठेवतो ज्याद्वारे गूगल आपल्याला आपल्यासाठी अनुकूल सेवा आणि माहिती उपलब्ध करुन देतो. 

चला मग समजून घेऊया की, गूगल आपल्याबाबत काय काय जाणतोय?

* आतापर्यंत गूगलमध्ये आपण जे काही सर्च केले आहे ते
आपण आतापर्यंत गूगलमध्ये जे काही लिहून सर्च केले आहे, ते सर्व कीवर्ड आणि वाक्य गूगलमध्ये स्टोर असतात, त्यांना आपण खालील लिंकवर पाहू शकता, (हे फक्त आपणास दिसेल, दूसऱ्या कुणालाच नाही आणि हे पाहण्यासाठी आपणास गूगल अकाउंटमध्ये लॉगिन करावे लागेल)
https://history.google.com/history/

* गूगलच्या सेवांवरील आपल्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटी
आपण गूगलच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये गूगल अकाउंटने लॉगिन करु न जे काही केले आहे, याचे संपूर्ण रेकॉर्ड आपण खालील लिंकवर जाऊन पाहू शकता. 
https://myactivity.google.com/myactivity

* आपणाद्वारे गूगलवर देण्यात आलेली व्यक्तिगत माहिती
आपले गूगल अकाउंट बनविताना किंवा नंतर गूगलचा वापर करताना जी काही व्यक्तिगत माहिती जसे मोबाइल नंबर, जन्म दिनांक आदी गूगलवर दिली आहे, ती माहिती आपण खालील लिंकवर जाऊन पाहू शकता. 
https://myaccount.google.com/privacy?pli=1#personalinfo

* कोणकोणत्या मोबाइल, टॅबलेट आणि संगणकाद्वारे गूगलवर लॉगिन केले आहे
आपण आतापर्यंत ज्या ज्या मोबाइल, टॅबलेट किंवा संगणकाद्वारे गूगल अकाउंटचा प्रयोग केला आहे, याची संपूर्ण माहिती खालील लिंकद्वारे मिळविता येऊ शकते. 
https://security.google.com/settings/security/activity
या लिंकवर गूगल आपण या डिवाईसवर शेवटचे लॉगिन केव्हा केले आहे, हे देखील दर्शवेल. 

* क्रोम किंवा अ‍ॅण्ड्राइडवर जो लॉगिन पासवर्ड सेव केला आहे
आपण संगणक किंवा अ‍ॅण्ड्राइड मोबाइलवर कोणत्याही वेबसाइटवर लॉगिन करतेवेळी जे यूजरनेम आणि पासवर्ड क्रोम ब्राउजरमध्ये सेव केले आहे, याची माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर जाऊन पाहू शकता. 
https://passwords.google.com/

* कोणकोणत्या वेबसाइटला गूगल खात्याच्या प्रयोगासाठी स्वीकृती देण्यात आली
आपण बऱ्याच वेबसाइटवर गूगलच्या माध्यमाने लॉगिन करतो, असे करतेवेळी आपण त्या वेबसाइट्सला आपल्या गूगल अकाउंटशी संबंधीत माहिती पूरवत असतो. याची संपूर्ण सूची खालील लिंकवर पाहण्यास मिळेल. 
https://myaccount.google.com/security#connectedapps

* आपण कोणकोणत्या ठिकाणी गेले आहेत- लोकेशन हिस्ट्री
गूगल सेवांचा प्रयोग करतेवेळी आपण गूगलला आपले लोकेशन जाणून घेण्याची परवानगी देतो. आतापर्यंत आपण कोणकोणत्या ठिकाणी गेलो आहोत, त्या ठिकाणची आणि रस्त्यांची संपूर्ण माहिती आणि आपली लोकेशन हिस्ट्री आपण खालील गूगल लिंकच्या आधारे जाणू शकता.
https://www.google.com/maps/timeline

* गूगलच्या कोणकोणत्या सेवांचा प्रयोग केला आहे, त्यासंबंधीत माहिती
गूगल डॅशबोर्डच्या खालील लिंकद्वारे आपण हे जाणू शकता की, आपण कोणकोणत्या गूगल सेवांचा प्रयोग करीत आहात. येथे आपण त्या सेवांशी जुडलेली सेटिंग बदलू शकता आणि माहिती मिळवू शकता.
https://www.google.com/settings/dashboard

* ओके गूगल आणि व्हॉइस कमांडद्वारे आपण काय काय बोलले 
आपण गूगलला ओके गूूगल किंवा गूगलवर बोलून जे काही इनपूत दिले आहे, याची संपूर्ण रेकॉर्डिंग आपण खालील लिंकद्वारे ऐकू शकता. 
https://history.google.com/history/audio

* आतापर्यंत यूट्यूबवर काय काय लिहून सर्च केले
आपण गूूगलची व्हिडिओ सेवा यूट्यूबवर आपल्या पसंतीचे व्हिडिओ सर्च क रण्यासाठी जे काही लिहून सर्च केले आहे, त्याची संपूर्ण सूची खालील लिंकवर जाऊन पाहू शकता. 
https://history.google.com/history/youtube/search

* यूट्यूबवर आतापर्यंत कोणकोणते व्हिडिओ पाहिलेत
यूट्यूबवर गूगलने लॉगिन करुन आपण आतापर्यंत कोणकोणते व्हिडिओ पाहिले आहेत या सर्व व्हिडिओंची सूची पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://history.google.com/history/youtube/watch

* आपण किती गूगल स्टोरेजचा प्रयोग करीत आहात
जेव्हाही आपण जीमेल, गूगल फोटो आणि अन्य गूगल सेवांचा प्रयोग करता, तेव्हा आपणास इंटरनेटवर १५ जीबीपर्यंत मेमरी स्पेस मोफत मिळते. यापैकी किती मेमरी शिल्लक आहे, हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 
https://myaccount.google.com/preferences#storage
 
* आपणास कोणकोणत्या विषयात आवड आहे
गूगल आपणास आवश्यक आणि योग्य जाहिराती दाखविण्यासाठी आपण केलेले सर्च आणि आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीजच्या आधारे आपली आवड जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. खालील लिंकच्या आधारे जाणून घेऊया की, गूगलने आपल्या आवडीबाबत काय माहिती एकत्रित केली आहे.
https://www.google.com/settings/ads/authenticated

Web Title: OMG: Google is storing all this 'information' about you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.