​OMG : पती ‘पॉर्न’च्या आहारी, पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 07:17 AM2017-02-28T07:17:03+5:302017-02-28T12:47:03+5:30

‘माझा पती पॉर्न साईट्सच्या आहारी गेला आहे. त्यामुळे मला आणि आमच्या मुलांना त्रास होतो. सरकारने आक्षेपार्ह वेबसाईट्सवर बंदी घालावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे.

OMG: Husband calls for 'porn', wife goes to Supreme court! | ​OMG : पती ‘पॉर्न’च्या आहारी, पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव !

​OMG : पती ‘पॉर्न’च्या आहारी, पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव !

googlenewsNext
ong>-Ravindra More
एका महिलेचा पती सतत पॉर्न पाहत असल्याने त्याचा त्रास स्वत: तिला आणि मुलांना होत असल्याने त्या महिलेने सरळ सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यात त्या महिलेने, ‘माझा पती पॉर्न साईट्सच्या आहारी गेला आहे. त्यामुळे मला आणि आमच्या मुलांना त्रास होतो. सरकारने आक्षेपार्ह वेबसाईट्सवर बंदी घालावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली आहे. संबंधित महिला मुंबईतील समाजसेविका असून पतीच्या या सवयीला त्रस्त होऊन शेवटी तिने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. 

पॉर्न साईट्स पाहण्याच्या पतीच्या सवयीमुळे आपलं वैवाहिक आयुष्य बर्बाद झालं आहे, त्यामुळे केंद्र सरकारने अशा प्रकारच्या आक्षेपार्ह साईट्सवर बंदी घालण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलावी अशी याचिका महिलेने केली आहे.

‘माझा पती रोजचा बहुतांश वेळ पॉर्नोग्राफिक व्हिडिओ आणि फोटा पाहण्यात घालवतो. त्याचं पूर्ण लक्ष त्याकडेच वेधलं गेल्याने आमच्या वैवाहिक जीवनात खोडा पडला आहे’ असं याचिकाकर्त्या महिलेने म्हटलं आहे. आपण ३० वर्ष सुखाने संसार केला, मात्र २०१५ मध्ये त्यांना ही सवय जडली आणि दोन मुलांचा पिता असलेला माझा नवरा पॉर्नच्या आहारी गेला, असं महिलेने म्हटलं आहे. अश्लील व्हिडिओ पाहणं हा गुन्हा नसला, तरी त्यामुळे महिलांविरोधी गुन्ह्यात वाढ होत असल्याचं महिलेनं म्हटलं आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुप्रीम कोर्टाने चाईल्ड पॉर्नोग्राफीवर बंदी आणण्यासाठी सरकारला सुचवलं होतं. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देश काहीही खपवून घेऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं.

Also Read : ​आपणही चोरून ‘पॉर्न’ पाहता? तर एका भयंकर आजाराच्या कचाट्यात आहात आपण !

Web Title: OMG: Husband calls for 'porn', wife goes to Supreme court!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.