OMG : सैफ अली खानची ‘ही’ अविवाहित बहीण आहे २७०० कोटींची मालकिण !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2017 07:48 AM2017-06-27T07:48:09+5:302017-06-27T13:18:09+5:30
सिनेसृष्टी आणि पेज थ्री पार्ट्यांपासून कायम दूर राहणारी, हिच्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही.
Next
ब लिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा सैफ अली खान आणि मुलगी सोहा अली खान यांना सर्वचजण ओळखतात. मात्र सिनेसृष्टी आणि पेज थ्री पार्ट्यांपासून कायम दूर राहणारी त्यांची धाकटी मुलगी सबा अली खान हिच्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही. विशेष म्हणजे सबा अली खान २७०० कोटींची मालकिण आहे. फॅमिली फंक्शन शिवाय ती कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. सबा आता ४१ वर्षांची असून अद्याप ती अविवाहित आहे.
पतौडी घराण्यातील अनेक जण बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. पण सबा सिनेसृष्टीपासून कायम लांब राहिली. याचे कारण म्हणजे तिचा लाजाळू स्वभाव आहे. एका मुलाखतीत स्वत: सबाने सांगितले होते, की कधीही मी सिनेसृष्टीत येण्याचा विचार केला नाही. मी जे काम करतेय, त्यात मी आनंदी आहे.
सबा अली खान ही ज्वेलरी डिझायनर असून तिचा स्वत:चा बिझनेस आहे. काही दिवसांपूर्वीच तिने डायमंड चेन सुरु केली आहेत. इतकेच नाही तर सैफने करीनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सबाला तिच्यासाठी एक सुंदर डायमंड सेट डिझाइन करायला सांगितला होता.
सबा भोपाळच्या औकाफ-ए-शाहीची प्रमुख आहे. भारत सरकार आणि भोपाळ संस्थानचे तत्कालीन नवाब हमीदुल्ला खां यांच्यात झालेल्या करारानुसार, औकाफ-ए-शाहीवर वक्फ बोर्डचा हक्क राहणार नसल्याचे ठरले होते. नवाब घराण्याची ही एक स्वतंत्र संस्था आहे. सरकारच्या करारानुसार, औकाफ-ए-शाहीचा प्रमुख हा भोपाळच्या नवाब किंवा पतौडी घराण्यातूनच असेल. औकाफ-ए-शाही जवळ कोट्यवधीची संपत्ती आहे.
४१ वर्षीय सबाचे अद्याप लग्न झालेले नाही. ती स्वतंत्रपणे स्वत:चा व्यवसाय सांभाळत आहे. औकाफ-ए-शाहीची प्रमुख असल्याने सबा पतौडी घराण्याच्या संपत्तीचा लेखाजोखा ठेवते. सैफ-सोहाप्रमाणे लाइमलाइटमध्ये न येतादेखील ती अतिशय बिझी असते. सबाची बहीण सोहा अली खानचे अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न झाले आहे.
Also Read : संतापला ‘डॅड’ सैफ अली खान; लेकीच्या बॉलिवूड डेब्यूला माझा विरोध का असेल?