​दीड वर्षांची मुलंदेखील ‘व्हिडिओ चॅट’साठी पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2016 02:06 PM2016-10-25T14:06:31+5:302016-10-25T14:06:31+5:30

‘अमेरिकन अ‍ॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ने (एएपी) लहान मुलांनी मल्टीमीडिया साधनांचा किती आणि कसा वापर करावा यासंबंधी नवी मार्गदशर्क तत्वे घोषित केली आहेत

One-and-a-half years 'eligible for video chat' | ​दीड वर्षांची मुलंदेखील ‘व्हिडिओ चॅट’साठी पात्र

​दीड वर्षांची मुलंदेखील ‘व्हिडिओ चॅट’साठी पात्र

Next
मेरिकन अ‍ॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ने (एएपी) लहान मुलांनी मल्टीमीडिया साधनांचा किती आणि कसा वापर करावा यासंबंधी  नवी मार्गदशर्क तत्वे घोषित केली आहेत. त्यानुसार दीड वर्षांपेक्षा मोठी मुलांनी कु टुंबासोबत व्हिडिओ चॅट करण्यास काहीच हरकत नाही.

तसेच दीड ते पाच वर्षे वयोगटातील मुले पालकांसोबत दर्जेदार कार्यक्रम पाहू शकतात. पण शारीरिक हालचाल (व्यायाम) व समोरासमोर संवाद करण्याकडे भर देण्यात यावा, असेही सांगण्यात आले.

‘मीडिया अँड यंग मार्इंडस्’ या रिपोर्टच्या प्रमुख जेनी रॅडेस्की यांनी माहिती दिली की, ‘पालकांनी मुलांशी माध्यमांचा वापर करण्याविषयी सक्रीयतेने चर्चा केली पाहिजे. कारण जास्त वेळ टीव्ही/इंटरनेटवर व्यतीत केला तर त्याचा खेळ, अभ्यास आणि झोपण्यावर परिणाम होऊ शकतो.

                                                         Family TV

स्वत: पालकांनीच मुलांना माध्यमांचा कसा वापर केला पाहिजे हे शिकवले पाहिजे. जेणेकरून त्यांना त्याचा सदुपयोग कळेल. तसेच दोन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना दिवसातून केवळ एका तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहू देऊ नये.

एवढेच नाही तर घरात अशी एखादी जागा असावी जेथे टीव्ही, कॉम्प्युटर, फोन यांसारखी साधने नसतील. ‘मीडिया फ्री’ जागा असेल तर मुलांचे लक्ष विचलित होणार नाही, अशा काही सुचना या रिपोर्टमध्ये करण्यात आल्या आहेत.

Web Title: One-and-a-half years 'eligible for video chat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.