सुंदर दिसायचंय मग चिमूटभर हळद पुरे आहे.

By Madhuri.pethkar | Published: November 6, 2017 06:46 PM2017-11-06T18:46:22+5:302017-11-06T18:49:45+5:30

त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्यांवर हळद ही रामबाण उपाय ठरू शकते. हळदीमधील अ‍ॅण्टिआॅक्सिडण्ट तत्त्वाचा उपयोग त्वचा आणि केसांनाही होतो. चेहे-यावरील मुरूम, पुटकुळ्या, डाग, पायाच्या तळव्यांच्या भेगा आणि केसातला कोंडा या सर्व समस्या चिमूटभर हळदीच्या उपायांनी सुटतात.

one pinch of turmeric sufficient for solving big beauty problems | सुंदर दिसायचंय मग चिमूटभर हळद पुरे आहे.

सुंदर दिसायचंय मग चिमूटभर हळद पुरे आहे.

googlenewsNext
ठळक मुद्दे* त्वचेवरचे दाग घालवायचे असतील तर हळद उत्तम उपाय आहे. हळदीमध्ये पूतिनाशक अर्थात अ‍ॅण्टीसेप्टीक तत्त्वं असल्या कारणानं त्वचेवर होणा-याजखमाही हळदीमुळे लवकर भरून येतात.* वयाच्या खुणा नुसत्या लपवण्यासाठीच नाही तर या खुणा निर्माण होवू नये म्हणून हळदीचा उपयोग फायदेशीर ठरतो.* स्ट्रेच मार्कसाठी असंख्य उपाय करून झाले असतील तर चिमूटभर हळद नक्की वापरून पाहा. यासाठी चिमूटभर हळद, थोडं केशर आणि लिंबाचा रस या तीन गोष्टी एकत्र कराव्यात.* केसातल्या कोंड्यावरही हळद गुणकारी आहे.

- माधुरी पेठकर

हळ्द ही आरोग्यदायी आहे. म्ह्णूनच औषधांपासून ते पदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्टीत तिचा उपयोग केला जातो. हळद म्हणजे मौल्यवान मसाला आहे. मसाल्यातलं सोनं म्हणजे हळद. परत हळद ही तशी किंमतींचा विचार करताही सर्वांनाच परवडते.अशा या हळदीचा उपयोग सौंदर्यप्रसाधन म्हणूनही करता येतो.
त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्यांवर हळद ही रामबाण उपाय ठरू शकते. हळदीमधील अ‍ॅण्टिआॅक्सिडण्ट तत्त्वाचा उपयोग त्वचा आणि केसांनाही होतो. चेहे-यावरील मुरूम, पुटकुळ्या, डाग, पायाच्या तळव्यांच्या भेगा आणि केसातला कोंडा या सर्व समस्या चिमूटभर हळदीच्या उपायांनी सुटतात.

सौंदर्यासाठी हळद

1) हळदीमध्ये ज्वलनविरोधक घटक असतात. त्याचाच उपयोग त्वचेची मोकळी रंध्र भरण्यासाठी तसेच त्वचेचा दाह कमी करण्यासाठी होतो. त्वचेवरचे दाग घालवायचे असतील तर हळद उत्तम उपाय आहे. हळदीमध्ये पूतिनाशक अर्थात अ‍ॅण्टीसेप्टीक तत्त्वं असल्या कारणानं त्वचेवर होणा-या जखमाही हळदीमुळे लवकर भरून येतात. चेहे-याच्या त्वचेवरील दाह कमी करण्यासाठी एक चमचा बेसनपीठात एक चिमूट हळद घालावी. पाण्यानं त्याची पेस्ट करून ती चेहे-याला लावावी. वीस पंचवीस मिनिटं लेप तसाच राहू द्यावा. नंतर कोमट पाण्यानं धुवून टाकावा.

2 वयाच्या खुणा नुसत्या लपवण्यासाठीच नाही तर या खुणा निर्माण होवू नये म्हणून हळदीचा उपयोग फायदेशीर ठरतो. हळदीमध्ये ककर्युमिनॉइड नावाचा घटक असतो. या घटकामुळे हळ्दीमधील अ‍ॅण्टिआॅक्सिडण्ट हा घटक त्वचेमध्ये झिरपतो. आणि हे अ‍ॅण्टिआॅक्सिडण्टस त्वचेच्या पेशींचं रक्षण करतात. यामुळे चेहे-याला नियमित हळदीचा लेप लावल्यास वयाच्या खुणा दिसत नाही तसेच सुरकुत्या आणि डाग असल्यास तेही कमी होतात.

3) हिवाळ्यात त्वचा फाटते. चेहे-याची आणि पायाच्या तळव्यांची त्वचा फाटते. यासाठी हळद मदत करते. थोड्या खोबरेल तेलात चिमूटभर हळद घालावी. ती चांगली मिसळून ती पेस्ट फाटलेल्या त्वचेवर लावावी. पंधरा मिनिटांनी हा लेप धुवून टाकावा. त्वचा मऊ मुलायम होते.

 

4) हळदीमध्ये दाह कमी करणारे गुण असतात. म्हणूनच हळदीचा उपयोग केल्यास थंड वाटतं. यासाठी थोडं दूध किंवा दही घ्यावं. त्यात चिमूटभर हळद घलावी. आणि हा लेप ज्या ठिकाणी दाह वाटत असेल तिथे लावावा. तो सुकू द्यावा. आणि मग थंड पाण्यानं लेप हळुवार स्वच्छ करावा. दाह तसेच जळलेली त्वचा बरी करण्यास हळद उपयोगी पडते. त्यासाठी रोज हा लेप लावायला हवा.

5) स्ट्रेच मार्कसाठी असंख्य उपाय करून झाले असतील तर चिमूटभर हळद नक्की वापरून पाहा. यासाठी चिमूटभर हळद, थोडं केशर आणि लिंबाचा रस या तीन गोष्टी एकत्र कराव्यात. आणि ही पेस्ट स्ट्रेच मार्कवर लावावी. पंधरा मिनिटं हा लेप ठेवून नंतर धुवून टाकावा. काही दिवस हा उपाय नियमित केल्यास स्ट्रेच मार्क जातात.

6) केसातल्या कोंड्यावरही हळद गुणकारी आहे. यासाठी एक चमचा हळद घ्यावी. दोन चमचे खोबरेल तेल किंवा आॅलिव्ह तेल घ्यावं. त्यात हळद एकजीव करावी. ही पेस्ट केसांच्या मुळाशी हलका मसाज करत लावावी. एक ते तीन तास ही पेस्ट केसात तशीच राहू द्यावी. नंतर सौम्य शाम्पूनं केस धुवावेत.

 

 

Web Title: one pinch of turmeric sufficient for solving big beauty problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.