केस वाढवायचे आहेत तर कांदा लावा!

By Madhuri.pethkar | Published: December 28, 2017 06:10 PM2017-12-28T18:10:18+5:302017-12-28T18:14:34+5:30

कांद्यामध्ये केसांना उपयुक्त असे विकर असतात. या विकरांचा उपयोग केस झटपट लांब होण्यासाठी होतो. कांद्यामुळे केस नुसतेच लांब होत नाहीत तर त्यांचं आरोग्यही सुधारतं. ते मजबूत होतात. केसांमधले दोष कांद्यामुळे दूर होतात.

Onion is easiest solution for hair grow | केस वाढवायचे आहेत तर कांदा लावा!

केस वाढवायचे आहेत तर कांदा लावा!

googlenewsNext
ठळक मुद्दे* कांद्यामध्ये सल्फर हा घटकही मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळेच कांदा जर केसांसाठी वापरला तर केसांचं गळणं कमी होतं.* कांद्यामध्ये असलेल्या अ‍ॅण्टिआॅक्सिडण्टमुळे केस लवकर पांढरे होत नाही.* कांद्यामुळे केस छान चमकदार होतात.




- माधुरी पेठकर


आपल्या केसांवर प्रेम नाही अशी मुलगी किंवा स्त्री सापडणं विरळच. त्यातही लांबसडक केसांची हौस असलेल्या तर अनेकजणी आहेत. अर्थात हौस आहे म्हणून प्रत्येकीचेच केस लांबसडक असतात असं नाही. पण केस लांबसडक होण्यासाठी काहीही उपाय करायला मुली आणि स्त्रिया तयार असतात. ब्युटी पार्लरमधल्या हेअर ग्रो ट्रीटमेण्टपासून ते खास हेअर क्लिनिकमध्ये जावून लांबसडक केसांसाठी गोळ्या औषधं खाण्यापर्यंत काहीही करायला त्या तयार असतात.

‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ या म्हणीप्रमाणेच आहे हे. खरंतर केस वाढवण्याचे, दाट करण्याचे उपाय खरंतर कोण्या पार्लरच्या किंवा हेअर क्लिनिकच्या हातात नसून आपल्याच हातात आहे. हा उपाय आपल्या घरात चक्क आपल्या स्वयंपाकघरात आहे. हा उपाय आहे कांद्याचा.

 

उग्र वासाचा कांदा आणि केसांना लावायचा.. अशक्य आहे हे . हे असं जरी वाटत असलं तरी हा उपाय केस लांब करण्यासाठी हमखास लागू पडणारा आहे.
कांद्यामध्ये केसांना उपयुक्त असे विकर असतात. या विकरांचा उपयोग केस झटपट लांब होण्यासाठी होतो. कांद्यामुळे केस नुसतेच लांब होत नाहीत तर त्यांचं आरोग्यही सुधारतं. ते मजबूत होतात. केसांमधले दोष कांद्यामुळे दूर होतात.
कांद्यामुळे केस लांब होतात हे मान्य पण हा कांदा केसांना लावावा कसा? असा प्रश्न पडला असेल तर कांदा केसांना लावायची पध्दत वाचा आणि नुसतीच वाचू नका तर कांदा केसांना लावून पाहा!

केसांना कांदा कसा लावाल?

* कांदयाचं वरचं साल सोलून घ्यावं. आणि कांदा बारीक चिरून घ्यावा.

* चिरलेला कांदा मिक्सरमध्ये बारीक वाटावा. अगदी त्याची बारीक आणि मऊ गर होईल असा वाटावा.

* नंतर हा गर गाळणीवर ठेवून किंवा कापडात गुंडाळून पिळून काढून रस काढावा.

* कांद्याचा रस आपण नेहेमी केसांना जे तेल लावतो त्यात मिक्स करावा.

* तेल आणि कांद्याचा रस एकत्र केलेलं मिश्रण केसांच्या मुळांशी लावावं. या मिश्रणानं हलका मसाज करावा.

* पाऊण ते एक तास कांद्याचं मिश्रण केसांवर राहू द्यावं. मग केस शाम्पूनं धुवावेत. हा कांद्याचा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करावा. काही आठवडे नियमित हा उपाय केल्यास केसांच्या लांबीत आणि मजबुतीत गुणात्मक वाढ झालेली नक्की आढळून येईल.

कांद्यामध्ये पोटॅशिअम आणि अ, क आणि इ जीवनसत्त्वं असतात याचा फायदा केसांचं पोषण होण्यासाठी होतो. कांद्यामध्ये सल्फर हा घटकही मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळेच कांदा जर केसांसाठी वापरला तर केसांचं गळणं कमी होतं. कांद्यामध्ये असलेल्या अ‍ॅण्टिआॅक्सिडण्टमुळे केस लवकर पांढरे होत नाही. आणि केस छान चमकदारही होतात.

Web Title: Onion is easiest solution for hair grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.