OTG केबलचे "हे" फायदे कदाचित आपणास माहित नसतील, जाणून घ्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2017 07:53 AM2017-06-09T07:53:06+5:302017-06-09T13:23:06+5:30

OTG केबलचे असे काही फायदे आहेत जे आपणास कदाचित अजून पर्यंत माहित नसतील. हे फायदे जाणून आपण बरीच कामे सहज आणि सुलभ करू शकतात.

OTG Cable's "These" Benefits You probably do not know, know! | OTG केबलचे "हे" फायदे कदाचित आपणास माहित नसतील, जाणून घ्या !

OTG केबलचे "हे" फायदे कदाचित आपणास माहित नसतील, जाणून घ्या !

googlenewsNext
OTG
केबलचे असे काही फायदे आहेत जे आपणास कदाचित अजून पर्यंत माहित नसतील. हे फायदे जाणून आपण बरीच कामे सहज आणि सुलभ करू शकतात. 

* कीबोर्ड
OTG द्वारे तुम्ही कीबोर्ड मोबाइल ला कनेक्ट करू शकता OTG मोबाइलला कनेक्ट करा व OTG च्या USB पोर्ट ला कीबोर्ड USB कनेक्ट करा आता तुम्ही TYPE करू शकता कीबोर्ड ने मोबाईल वर याचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला जास्त मजकूर TYPE करायचा असेल किंवा मोठा मेल TYPE करायचा असेल.

* माऊस
OTG द्वारे तुम्ही मोबाइलला माऊस जोडू शकता. यासाठी OTG मोबाइलला जोडा व त्या OTG USB ला माऊस USB जोडा या नंतर तुम्ही माऊस ने मोबाईल OPERATE करू शकता.

* Usb fan 
OTG केबल द्वारे तुम्ही मोबाईल ला USB फॅन जोडू शकता बाजारात 60 पासून 300 रुपयापर्यंत USB फॅन मिळतात.या USB फॅन ची हवा हि उत्तम येते व या द्वारे गरम होणारे मोबाईल सुद्धा थंड करता येतात.

* कार्ड रीडर
OTG ने मोबाइलला कार्ड रीडर जोडता येते. यासाठी OTG मोबाइलला कनेक्ट करा व त्यानंतर कार्ड रीडर OTG ला जोडा आता तुम्ही डेटा कॉपी पेस्ट DELETE करू शकता.

* Game कंट्रोलर
आपले आवडते Game आपण मोबाइल वर खेळतो पण आपली बोटे त्याने दुखत असतात.अशा वेळी आपण मोबाइलला game console attach करू शकतो यासाठी आपल्याला OTG ला GAME CONSOLE USB ATTACH करावा लागेल. CONSOLE वरून मनमुराद गेमिंग चा आनंद घेऊ शकता.

* Usb light
Otg केबल ने आपण मोबाईल ला usb light जोडू शकतो यासाठी otg कनेक्ट करून त्या otg ला usb light जोडा मोबाईल फ्लॅश light पेक्षा जास्त चांगला प्रकाश तुम्हाला मिळेल.

* Lan cable
ब्रॉडबँड connection जर डायरेक्ट मोबाईल ला कनेक्ट करायचे असेल तर otg द्वारे आपण ते करू शकतो प्रथम मोबाइलला otg जोडा व otg ला lan केबल जोडा यानंतर ब्रॉडबँड पिन lan केबल ला जोडा अश्या प्रकारे wifi व डेटा connection बंद होऊन मोबाईल मध्ये नेट सर्विस आपण वापरू शकतो.

* हार्ड डिस्क
Otg केबल ने आपण 500 gb 1 tb 2 tb हार्ड डिस्क मोबाईल ला कनेक्ट करू शकता डेटा कॉपी पेस्ट delete करू शकता.

* DSLR
Camera चा dslr आपण otg ने ऑपरेट करू शकतो यासाठी प्ले स्टोर वरून फक्त एक dslr डॅशबोर्ड अप्लिकेशन घ्यावे लागेल

*ऑडिओ साऊंड कार्ड
ऑडिओ आउटपुट सुद्धा otg ने करता येते यासाठी otg मोबाइलला कनेक्ट करून एक ऑडिओ कार्ड या otg ला कनेक्ट करू शकता यानंतर हेडफोन्स त्या ऑडिओ कार्ड ला जोडून music चा आनंद घेऊ शकता मोबाईल चा ऑडिओ आउटपुट डेड झाल्यास याचा चांगला उपयोग बाजारात असे ऑडिओ कार्ड उपलब्ध आहेत.

* Otg ने मोबाईल चार्जिंग
तुमच्या मोबाईल ने दुसऱ्या मोबाइलला चार्ज करता येते या साठी तुम्हाला फक्त otg मोबाईल ला कनेक्ट करायचे आहे व त्यानंतर त्या otg ला चार्जिंग केबल कनेक्ट करायची व त्या चार्जिंग केबल चे दुसरे टोक दुसऱ्या मोबाईल ला कनेक्ट करायचे दुसरा मोबाईल चार्ज व्हायला सुरुवात होते

Web Title: OTG Cable's "These" Benefits You probably do not know, know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.