​नवऱ्याशिवाय हनीमुनला गेली ही पाकिस्तानी ‘क्वीन’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2016 05:10 PM2016-07-13T17:10:26+5:302016-07-13T22:40:26+5:30

खरीखुरी ‘क्वीन’ होण्याची पाळी हुमा मोबीन या नवविवाहितेवर आली.

Pakistani Queen 'Honeymoon' | ​नवऱ्याशिवाय हनीमुनला गेली ही पाकिस्तानी ‘क्वीन’

​नवऱ्याशिवाय हनीमुनला गेली ही पाकिस्तानी ‘क्वीन’

Next
ीमून म्हणजे नवदाम्पत्यासाठी मनोमिलनाचा, एकमेकांना जाणून घेण्याचा काळ असतो. त्यामुळे जर नवविवाहित जोडप्यापैकी एकालाच  हनीमूनला जाण्याची पाळी आली तर त्या जोडप्यासाठी यापेक्षा मोठ्या दु:खाची बाब दुसरी कोणती असेल? तुम्हाला कदाचित कंगणा रनौटच्या ‘क्वीन’ चित्रपटाची आठवण झाली असेल.

अशीच एक खरीखुरी ‘क्वीन’ होण्याची पाळी हुमा मोबीन या नवविवाहितेवर आली. पाकिस्तानातील लाहोर शहरातील हुमा आणि अर्सलान हे जोडपे मधुचंद्रासाठी ग्रीसला जाणार होते. त्यासाठी हॉटेल बुकिंग, विमान तिकिट बुकसुद्धा केले. पण अर्ललानला ग्रीसचा व्हीजा नाकारण्याला आला.

दोघांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. हनीमुनसाठी जिथे जायचे आहे तेथे नवऱ्याला प्रवेशच मिळणार नाहीए.ट्री कॅन्सल करायची तर केलेल्या सर्व पैशावर पाणी सोडावे लागेल. मग करायचे तरी काय? तेव्हा अर्सलानच्या खुप समाजावल्यानंतर हुमा हनीमुनला नवऱ्याशिवाय जायला तयार झाली.

तिच्यासोबत अर्सलानचे आईवडिलही गेले. ती सांगते, मला तर जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण त्याने खूप आग्रह केला. ग्रीसमध्ये पोहचल्यावर अर्सलानच्या आठवणीत मी सासुबार्इंपाशी संपूर्ण रात्र रडत होते. त्यांनीच माझी समजूत काढली. सासू-सुनेपेक्षा आमचे नाते मैत्रीचे आहे.

संपूर्ण ट्रीपमध्ये हुमाने हवेतच कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवला आहे असे फोटो काढले. ती म्हणते की, अर्सलानला मी किती मिस करते हे दर्शविण्यासाठी मी त्याची कल्पना करून जणू तो काही माझ्यासोबत आहे आणि मी त्याच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे, असे फोटो काढले. तो जेव्हा कामानिमित्त बाहेरगावी जातो तेव्हा मला मिस करतो म्हणून असे फोटो काढतो. एकमेकांची किती आठवण येतेय हे सांगण्याची आमची ही पद्धत आहे.

Huma Mobin

huma Mobin

Huma Mobin
 हुमा आणि अर्सलान 

Web Title: Pakistani Queen 'Honeymoon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.