पॉल बेटी ठरले पहिले अमेरिकन ‘बुकर’ लेखक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2016 06:08 PM2016-10-26T18:08:05+5:302016-10-26T18:08:46+5:30

त्याच्या ‘द सेलआॅऊट’ कादंबरीला यंदाच्या ‘मॅन बुकर प्राईज’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.

Paul Beatty became the first American 'booker' author | पॉल बेटी ठरले पहिले अमेरिकन ‘बुकर’ लेखक

पॉल बेटी ठरले पहिले अमेरिकन ‘बुकर’ लेखक

Next
ग्रजी साहित्यातील अत्यंत मानाचा असा ‘मॅन बुकर प्राईज’ मिळवणारे पॉल बेटी हे पहिले अमेरिकन लेखक ठरले आहेत. अमेरिकेतील वर्णभेदाच्या राजकारणारावर विनोदीशैलीत ताशेरे ओढणाऱ्या त्याच्या ‘द सेलआॅऊट’ कादंबरीला यंदाच्या ‘मॅन बुकर प्राईज’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.

लॉस एंजलिस येथे जन्मलेल्या या ५४ वर्षीय लेखकाच्या कादंबरीचे मुख्य पात्र त्याची आफ्रिकन-अमेरिकन ओळख ठासून दर्शविण्यासाठी पुन्हा एकदा गुलामगिरी व भेदभावाची संस्कृती प्रस्थापित करू पाहते. बेटी यांच्या मते, सर्वच वाचकांना ही कादंबरी पचनी पडेलच असे नाही.

यंदाच्या बुकर प्राईजच्या प्रमुख परीक्षक अमांडा फोरमॅन मात्र म्हणतात, ‘साहित्य केवळ वाचकाचे सांत्वन करणारे नसावे. सत्य हे कटू असते आणि ते तसेच स्वीकारले पाहिजे. ‘द सेलआऊट’ कादंबरी हे त्याचेच उदाहरण आहे. म्हणून तर तिची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण जगात आज जे वर्णभेदी वातावरण आहे त्यानुसार ही कादंबरी फार समयसुचक आहे.’

बेटी यांची लेखनशैली मार्क ट्वेन आणि जॉनथन स्विफ्ट यांच्या तोडीसतोड असल्याचे परीक्षकांनी नमुद केले. लंडनच्या गिल्डहॉल येथे पार पडलेल्या ब्लॅक-टाय डिनर कार्यक्रमात ५० हजार पौंड रक मेच्या या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रकाशक ‘वनवर्ल्ड’साठी हा पोठोपाठ दुसरा ‘बुकर’ ठरला. गत वर्षी विजेते ठरलेले मार्लन जेम्स लिखित ‘अ ब्रिफ हिस्ट्री आॅफ सेव्हन किलिंग्स’ हे पुस्तकदेखील त्यांनीच प्रकाशित केले होते.

Booker

पुरस्कार स्वीकारताना भावनावश झालेले बेटी म्हणाले की, ‘मला फार ड्रमॅटिक  व्हायचे नाहीए परंतु मला झालेला आनंद मी लपवूसुद्धा शकत नाही. लेखनामुळे माझे जीवन साकारले आणि आयुष्य सावरले.’

Web Title: Paul Beatty became the first American 'booker' author

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.