​अमेरिकन लोकांना बचतीचे वेध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 05:19 PM2016-04-26T17:19:28+5:302016-04-26T22:49:28+5:30

​प्रत्येक तीन अमेरिकन नागरिकांपैेकी दोघे खर्चापेक्षा बचतीला अधिक महत्त्व देताना दिसत आहे.

The perception of saving the American people | ​अमेरिकन लोकांना बचतीचे वेध

​अमेरिकन लोकांना बचतीचे वेध

Next
ेरिकेची अर्थव्यवस्था थोडीशी संथ झाली आहे. याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमेरिकन नागरिक आता डोळे झाकून खर्च करण्यापेक्षा बचतीकडे अधिक लक्ष देत आहेत.

प्रत्येक तीन अमेरिकन नागरिकांपैेकी दोघे खर्चापेक्षा बचतीला अधिक महत्त्व देताना दिसत आहे. 2001 नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाण लोक बचतीला प्राधान्य देत आहेत.

6-10 एप्रिलच्या गॅलप पोलनुसार 65 टक्के अमेरिकन लोक खर्चात शक्य तितकी कपात करून जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न करतात. 2008 साली आलेल्या ‘जगातिक महामंदी’नंतर हा ट्रेंड आल्याचे दिसून येते.

कारण महामंदीपूर्वी केवळ 49 टक्के लोक बचतीला महत्त्व द्यायचे; परंतु पुढच्या नऊ गॅलप पोलदरम्यान हा आकडा 60 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचला.

2008 सालापूर्वी तिशीच्या आतील लोक जास्त पैसे खर्च करत. 30 ते 49 वयोगटातील बचत आणि खर्च यांना समान महत्त्व देत असत तर 50 ते 64 वयोगटातील लोक बचत करण्याला प्राधान्य देत. 65 वर्षांच्या पुढील लोक तर हमखास बचतीचा मार्ग अवलंबवित असत. काळानुसार बचत करण्याकडे लोकांचा कल वाढला.  पहिल्या तीन वयोगटांमध्ये सर्वाधिक बदल झाला.

Web Title: The perception of saving the American people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.