​न्यूझीलंडमध्ये ड्रोनद्वारे पिझ्झा डिलिव्हरीला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2016 02:12 PM2016-08-26T14:12:15+5:302016-08-26T19:42:15+5:30

न्यूझीलंडमध्ये ड्रोनद्वारे पिझ्झा डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली असून, असे करणारा तो पहिला देश आहे.

Permission for delivery of pizza through a drone in New Zealand | ​न्यूझीलंडमध्ये ड्रोनद्वारे पिझ्झा डिलिव्हरीला परवानगी

​न्यूझीलंडमध्ये ड्रोनद्वारे पिझ्झा डिलिव्हरीला परवानगी

Next
त्रज्ञानाच्या प्रगतीमुळं आपल्या जगण्याच्या पद्धती आणि आसपासचे जग झपाट्याने बदलत आहे. घरपोच सेवांचा वापर वाढतो आहे. एका क्लिकसरशी वस्तू घरी मिळतात. त्यामध्ये पिझ्झा डिलिव्हरी तर सर्वांचीच फेव्हरेट. पिझ्झाप्रेमींना खुश खबर म्हणजे न्यूझीलंडमध्ये ड्रोनद्वारे पिझ्झा डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली असून, असे करणारा तो पहिला देश आहे.

न्यूझीलंडचे वाहतूक मंत्री सिमॉन ब्रिजेस यांनी या बातमीला दुजोरा देत सांगितले की, डॉमिनोज् पिझ्झा इंटरप्राईजेस आणि ड्रोननिर्माता कंपनी फ्लर्टी यांनी मिळून ‘मानवरहित पिझ्झा डिलिव्हरी’ सुविधेची सुरूवात केली आहे. हवाई नियमनाचे आधुनिक व पुरोगामी कायद्यांमुळे दोन्ही कंपन्यांनी न्यूझीलंडची निवड केली आहे.

गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये न्यूझीलंडने स्वीकारलेल्या नव्या कायद्यामध्ये ‘अनमॅनड् एरिअल वेईकल’ (यूएव्ही) म्हणजेच ड्रोनचा व्यवसायिक उपयोग करण्याची तरतुद करण्यात आली आहे. पिझ्झा डिलिव्हरीसाठी ड्रोनला परवानगी देऊन न्यूझीलंडने जगभरातील टेक्नोकंपन्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे धोरण अवलंबविले आहे.

लवकरच चालकरहित/स्वयंचलित प्रवासी वाहतूकसेवांना परवानगी देण्यासाठी कायद्याचा पुनर्विचार करण्यात येणार असल्याची माहितीदेखील ब्रिजेस यांनी दिली. मार्च महिन्यात एका पिझ्झा कंपनीने रोबोटद्वारे पिझ्झा डिलिव्हरी करण्याचा प्रयोग न्यूझीलंडमध्ये सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Drone

Web Title: Permission for delivery of pizza through a drone in New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.