त्वचेला चिरतरुण ठेवणारा द्राक्षांचा लेप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2016 01:35 AM2016-03-21T01:35:12+5:302016-03-20T18:35:12+5:30

 चाळीशीतरही विशीसारखे दिसाल, यात शंका नाही. 

Planting a tropical vine | त्वचेला चिरतरुण ठेवणारा द्राक्षांचा लेप

त्वचेला चिरतरुण ठेवणारा द्राक्षांचा लेप

Next
े वय वाढते, तसे त्वचेचे सौंदर्य कमी होते. यामुळे तुम्ही वयस्करही दिसू लागता. चेहºयावरुन तुमच्या वयाचा अंदाज लावता येतो. मात्र काही नैसर्गिक उपायांनी तुम्ही त्वचा चिरतरुण ठेवू शकता. यामुळे चाळीशीतरही विशीसारखे दिसाल, यात शंका नाही.

हे सर्व उपाय घरच्या घरी करण्यासारखे आहेत. यासाठी द्राक्षांचा लेप फायदेशीर आहे. यामुळे चेहºयावर ताजेपणा येतो. 

काही द्राक्षे घेऊन त्या बारीक करुन त्याचा फेस मास्क बनवा. ही पेस्ट चेहºयाला लाऊन 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहºयावरील मृतपेशी निघतात आणि तो उजाळतो.

ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी काळ्या द्राक्षामध्ये मुलतानी माती मिक्स करुन फेस पॅक तयार करावा. यामध्ये काही गुलाबाच्या पाण्याचे थेंब टाकावे. 

हा पॅक चेहºयावर 15 मिनिटे ठेवून स्वच्छ पाण्याने  धुवावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते.  या उपायांनी चेहºयावर उजळपणा येतो. तेलकट त्वचा असणाºयांना देखील याचा फायदाच आहे. 

Web Title: Planting a tropical vine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.