चेहऱ्याने खेळा ‘स्नॅपचॅट’वर गेम !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2016 05:02 PM2016-12-27T17:02:32+5:302016-12-27T18:07:06+5:30

स्मार्टफोनवर एखादा गेम खेळायचा असेल तर बोटांच्या साहाय्याने खेळावा लागेल. मात्र आता स्रॅपचॅट या लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशनवर बोटांऐवजी चेहºयाने गेम खेळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Play face to snapchat game! | चेहऱ्याने खेळा ‘स्नॅपचॅट’वर गेम !

चेहऱ्याने खेळा ‘स्नॅपचॅट’वर गेम !

googlenewsNext
मार्टफोनवर एखादा गेम खेळायचा असेल तर बोटांच्या साहाय्याने खेळावा लागेल. मात्र आता स्नॅपचॅट या लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशनवर बोटांऐवजी चेहऱ्याने गेम खेळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
‘सांताज हेल्पर’ हा नवीन गेम स्नॅपचॅटवर सादर करण्यात आला असून, यात क्रिसमसशी संबधित असणाऱ्या ‘एल्फ’ या पात्राच्या चेहऱ्यावर संबंधित यूजरचा चेहरा हा ‘लेन्स फिल्टर’च्या मदतीने पेस्ट करण्यात येतो. यानंतर यूजर स्मार्टफोनला हलवत स्कीईंग करू शकतो. यात त्याला विविध अडथळ्यांवर मात करायची असते. हा गेम खेळत असतांनाची प्रतिमा अथवा व्हिडीओला आपल्या मित्रांसोबत शेअर करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे. दरम्यान, स्नॅपचॅटने ‘सिमॅजिन’ ही इस्त्राएली स्टार्टअप कंपनी विकत घेतल्याचे वृत्त आहे. ही कंपनी आॅग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीशी संबंधित असल्याचे आगामी काळात स्नॅपचॅट याच्याशी संबंधित फिचर्स सादर करू शकते.


 

Web Title: Play face to snapchat game!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.