अशी होती Playboy चे संस्थापक ह्यूग हेफनरची लाइफस्टाइल, ८६ व्या वर्षी २६ वर्षाच्या तरुणीसोबत केले होते लग्न !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 08:19 AM2017-09-28T08:19:50+5:302017-09-28T13:49:50+5:30
मीडिया रिपोर्टनुसार हेफनर यांनी म्हटले होते की, त्यांचे किती महिलांशी संबंध होते हे त्यांनाही माहित नव्हते. म्हणून त्यांनी मोजणेच सोडून दिले होते.
Next
ज प्रसिद्ध प्लेबॉय मॅगजिनचे संस्थापक ह्यूग हेफनर यांचे त्यांच्या राहत्या घरी ‘प्लेबॉय मेंशन’ येथे नुकतेच निधन झाले. विशेष म्हणजे त्यांच्या मृत्युनंतरही प्लेबॉय ४३ मिलियन डॉलरची कंपनी आहे. प्लेबॉय मॅगजिनची सुरुवात ६० वर्षाअगोदर १९५३ मध्ये झाली होती. हे मॅगजिन आपल्या कॉन्टेंटमुळे पुरुषांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. हेफनर यांना ‘हेफ’नावानेही ओळखले जाते. काही दिवसांपासून ते आजारपणामुळे लाइमलाइटपासून लांब होते. आॅगस्ट महिन्यातील प्लेबॉयच्या वार्षिक कार्यक्रमातही ते उपस्थित नव्हते. रेड स्मोकिंग जॅकेट आणि तोंडात पाइप ही हेफनरची ओळख होती.
अमेरिकी बिजनेसमॅन आणि अॅडल्ट मॅगजिनचे पब्लिशर ह्यूग हेफनरने यांनी क्रिस्टल हॅरिससोबत ३१ डिसेंबर २०१२ मध्ये एका कार्यक्रमात लग्न केले होते. विशेष म्हणजे त्यावेळी हेफनर ८६ वर्षाचे होते आणि हॅरिस २६ वर्षाची होती. हेफनर यांचे हे तिसरे लग्न होते, ज्याविषयी खूप चर्चा झाली होेती. हेफनरने एक असा ब्रांड तयार केला आहे ज्याने २० व्या शतकाच्या शेवटच्या पाच दशकांसाठी सेक्शुअल कल्चरला फक्त परिभाषितच केले नाही तर एक नवी दिशादेखील दिली. हे मॅगजिन आर्टिकल शिवाय सुंदर महिलांसाठीदेखील ओळखले जाते.
* सेना सोडून प्लेबॉय मॅगजिनची निर्मिती
सेनामध्ये सेवा दिल्यानंतर हेफनर यांनी कॉलेज जॉइन केले. पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्ये काम करीत असताना त्यांना प्लेबॉयची आयडिया सुचली. विशेष म्हणजे हेफनर यांच्या लाइफस्टाइलची चमक त्यांनी उभारलेल्या एंटरप्राइजपेक्षा जास्त होती.
* १३४६ करोडच्या घरात राहत होते हेफनर
ह्यूग हेफनर यांनी आपले घर फक्त १० लाखात खरेदी केले होते. लॉस एंजिलिस स्थित या घराची किंमत आता सुमारे १३४६ करोड रुपये आहे. या घराला १९२७ मध्ये बनविण्यात आले होते. या घरालाच प्लेबॉय मेंशन असे म्हटले जाते. २० हजार स्क्वेयर फुट जागेत उभारलेल्या या घरात २९ रुम्स आहेत.
* खूप महिलांशी होते संबंध
ह्यूग हेफनर आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आणि बऱ्याच अफेअर्समुळे नेहमी चर्चेत राहायचे. असेही म्हटले जाते की, त्यांचे अॅक्ट्रेस आणि मॉडेल्सशीदेखील संबंध होते. मीडिया रिपोर्टनुसार हेफनर यांनी म्हटले होते की, त्यांचे किती महिलांशी संबंध होते हे त्यांनाही माहित नव्हते. म्हणून त्यांनी मोजणेच सोडून दिले होते.