PM मोदीने लॉन्च केले "BHIM Aadhar pay", विना मोबाइलने होईल डिजिटल पेमेंट !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 10:51 AM2017-04-14T10:51:53+5:302017-04-14T16:44:41+5:30
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीने नागपुरमध्ये डिजिटल ट्रान्जेक्शनसाठी विशेष पेमेंट सिस्टम लॉन्च केली.
Next
पंतप्रधान नरेंद्र मोदीने नागपुरमध्ये डिजिटल ट्रान्जेक्शनसाठी विशेष पेमेंट सिस्टम लॉन्च केली. ही बायोमेट्रिक बेस्ड पेमेंट सिस्टम विशेषत: व्यापाऱ्यासाठी आहे, ज्यामुळे खरेदी सोपी होईल. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम आधारित ही सेवा सुरु करण्यात आली.
कसे करेल काम
* थंब इंप्रेशनद्वारे पेमेंट केले जाऊ शकते
‘आधार पे’ व्यापाऱ्यासाठी बनविण्यात आलेले आधार इनेबल पेमेंट सिस्टम आहे. हे त्या लोकांसाठी खास बनविण्यात आले आहे, ज्यांच्याजवळ डेबिट कार्ड, मोबाइल वॉलेट आणि मोबाइल फोन नाही.
* आधार पे फक्त व्यापाऱ्याजवळ असेल
आधार पे एक अॅप आहे, जे फक्त व्यापाऱ्याजवळच असेल. यूजर्सला फक्त आपला आधार नंबर आणि मोबाइल नंबर आपल्या बँक अकाउंट, डेबिट किंवा क्रे डिट कार्डाशी लिंक करावा लागेल.
* असा होईल ‘आधार पे’चा वापर
विक्रेते या अॅपला प्ले स्टोरमधून फ्री डाउनलोड करु शकता. यानंतर त्यांना आपल्या फिंगरप्रिंट आणि आधार कार्डाद्वारे रजिस्टर करावे लागेल.
* यूजर्सला पेमेंट करण्यासाठी काय करावे लागेल
व्यापारी या अॅपला प्ले स्टोर मधून डाउनलोड करतील, त्यानंतर कस्टमर्सकडून आॅनलाइन पेमेंट घेण्यासाठी पात्र ठरतील. कस्टमरच्या बॅँक अकाउंटमधून सरळ व्यापाऱ्याच्या बॅँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. यासाठी कस्टमरकडून त्याचा आधार नंबर मागितला जाऊ शकतो आणि कोणत्या अकाउंटद्वारे ट्रान्सफर करायचे आहे ते सिलेक्ट करण्याचे आॅप्शन दिले जाऊ शकते.
* कस्टमरला काय होईल फायदा
कस्टमर्सना आधार पेद्वारे पेमेंट करण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डाची गरज नसेल. विशेष म्हणजे इतर पेमेंट अॅप्स आणि ‘पीओएस’ मशिनसारखे यात इंटरनेटचीदेखील आवश्यकता नाही.
* व्यापाऱ्याना मिळेल कॅशबॅक
असे सांगितले जात आहे की, या योजनेद्वारे व्यापाऱ्याला कॅशबॅक दिली जाणार आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त व्यापारी याचा वापर करतील. यासाठी दोन नव्या इंसेटिव योजनादेखील सुरु केल्या आहेत. ज्यात ‘भीम कॅशबॅक ’ आणि ‘रेफरल बोनस’ यांचा समावेश आहे.