मेकअप प्रोडक्ट्सची ऑनलाईन शॉपिंग करताना 'या' गोष्टी तपासून पहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 10:48 AM2018-07-12T10:48:19+5:302018-07-12T10:49:16+5:30
सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेन्ड असून लोकं घरातून बाहेर जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंगला जास्त महत्त्व देतात. घरात आरामात बसून आपल्याला पाहिजे ती गोष्ट ऑर्डर केली की, घरपोच मिळते.
सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेन्ड असून लोकं घरातून बाहेर जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंगला जास्त महत्त्व देतात. घरात आरामात बसून आपल्याला पाहिजे ती गोष्ट ऑर्डर केली की, घरपोच मिळते. मग ते कपडे, गॅझेट्स, होम अप्लायंसेस, ब्युटी प्रोडक्ट्स कोणतीही गोष्ट असो घरबसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता. बऱ्याचदा महिला ब्युटी प्रोडक्ट्स तसेच मेकअप प्रोडक्ट्स ऑनलाईन ऑर्डर करतात. अशावेळी काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. कारण ब्युटी प्रोडक्ट्स आणि मेकअप प्रोडक्ट्सचा वापर आपण आपल्या त्वचेवर करतो. चुकीचे प्रोडक्टचा वापर केल्यास अॅलर्जी अथवा इतर अन्य त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही ऑनलाईन मेकअप प्रोडक्ट्स ऑर्डर करणार असाल तर काही गोष्टी तपासून पहाणे गरजेचे असते...
स्किन टाईप
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची त्वचा कोणत्या टाईपची आहे, हे तपासून पहाणे गरजेचे असते. कोणत्याही प्रकारचे ब्यूटी प्रोडक्ट खरेदी करताना तुमची त्वचा ज्याप्रकारची आहे त्याला ते प्रोडक्ट सुट होईल का? त्यामुळे त्वचेला कोणती अॅलर्जी तर होणार नाही ना? या सर्व गोष्टी तपासून पहाव्यात.
विश्वासार्ह्य साईटचा वापर करा.
वेगवेगळ्या साईटवर जाऊन प्रोडक्टच्या किमतींमध्ये तुलना करण्यापेक्षा एखाद्या विश्वासार्ह्य साईटवर जाऊन आपल्याला हव्या असलेल्या प्रोडक्टची ऑर्डर करावी. अनेक वेबसाईट असा आहेत की त्यांच्या ग्राहकांना त्या लॉयल्टीची ऑफरही देतात.
तुमच्या आवडीचा सुगंध लक्षात घेऊन ऑर्डर करा
जर तुम्ही ऑनलाईन परफ्युम खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा आवडता सुगंध लक्षात घेऊन ऑर्डर करा. बऱ्याचदा काही सुगंधांमुले आपल्याला अॅलर्जी होण्याची शक्याता असते त्यामुळे पहिल्यांदा नीट पडताळून मगच ऑर्डर करा. परफ्यूम लिमिटेड अॅडिशनमधील असेल तर त्याबाबत नीट माहिती तपासून मगच ऑर्डर करा.
ब्लॉगर्स आणि ग्राहकांचे रिव्यू वाचा
कोणत्याही साइटवरून कोणतेही ब्युटी प्रोडक्ट खरेदी करण्याआधी ब्लॉगर्सचे रिव्यू वाचून घ्या. त्यामुळे तुम्हाला एखादे प्रोडक्ट खरेदी करताना मदत होईल.
प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीची माहिती घ्या.
बऱ्याचदा ऑनलाईन कंपनी आपल्या साइटच्या माध्यमातून थर्ड पार्टी सेलरला त्यांचे प्रोडक्ट विकण्याची परवानगी देते. त्यामुळे तुम्ही ऑर्डर करत असलेल्या प्रोडक्टसोबतच ते तयार करणाऱ्या कंपनीबाबतही योग्य ती माहिती जाणून घ्या.