बोर झाल्यामुळे वाढतात टोकाची राजकीय मते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2016 03:28 PM2016-07-08T15:28:10+5:302016-07-08T20:58:10+5:30

लोकांची कंटाळवाणेपणातून टोकाची आणि भिन्न राजकीय मते बनतात.

Political views of extremists grow due to bore | बोर झाल्यामुळे वाढतात टोकाची राजकीय मते

बोर झाल्यामुळे वाढतात टोकाची राजकीय मते

Next
प बोर होतयं’ असे वाक्य दिवसातून अनेक वेळा आपण तरी म्हणतो किंवा आपल्या कानी तरी पडते. मन रमविण्यासाठी मग आपण काही तरी अ‍ॅडव्हेंचरस किंवा अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण जर तुमचे मन रमलेच नाही तर तुमची वृत्ती अधिक टोकाच्या राजकीय विचारांकडे झुकण्याची शक्यता असते.

‘किंग्स कॉलेज लंडन’ आणि ‘लिमरिक विद्यापीठा’तील संशोधकांनी केलेल्या अध्यनातून असे दिसून आले की, लोकांची कंटाळवाणेपणातून टोकाची आणि भिन्न राजकीय मते बनतात. डॉ. विन्यार्ड सांगतात की, ‘कंटाळवाणेपणा व्यक्तीा अस्वस्थ करतो. त्याचे मन त्याला काही तरी धाडसाचे किंवा आकर्षक किंवा हेतूपूर्ण गोष्टी करण्याकडे ढकलते. मग टोकाच्या राजकीय विचारसरणीमध्ये अशी वृत्ती आसरा शोधते.’

रोजच्या नीरस, बोरिंग दिनचर्येपेक्षा काही तरी वेगळे करण्याची हुरहुरीमुळे डोक्यातील विचारचक्र सुरू होतात. या एक प्रयोग आणि दोन शास्त्रोक्त सर्व्हेक्षणाच्या आधारावर प्रस्तूत संशोधनातील निष्कर्ष काढण्यात आले आहेत. सुरुवातीच्या प्रयोगात आयर्लंडमधील एका विद्यापीठ कॅम्पसमधील ९७ लोकांची निवड करण्यात आली होती.

सर्व लोकांनी प्रयोगाआधी आपापले राजकीय प्रवृत्ती नमुद केली. त्यानंतर त्यांना बोरिंग आणि अतिबोरिंग मानली जातात अशी कामे करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची जी मन:स्थिती होती त्यावेळी त्यांना पुन्हा त्यांची प्रवृत्ती विचारली असता त्यांच्या मतांमध्ये परिवर्तन आल्याचे दिसले.

Web Title: Political views of extremists grow due to bore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.