प्रिन्स विल्यम्सचे नवे कार्यालय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:07 AM2016-01-16T01:07:28+5:302016-02-06T07:39:58+5:30
ख्रिसमस ब्रेकनंतर सज्ज एअर अँम्बुलन्स रेस्कूचे पायलट ख्रिसमस ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा कामासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी एक सुसज्ज कार्यालय घेतले आहे.
Next
्यूक ऑफ केंब्रिजच्या एअर अँगलिएन अँम्बुलन्समध्ये काम करीत असलेले विल्यम्स यांनी एअर अँम्बुलन्सच्या बेसवर केंब्रिजमध्ये हे तयार केले आहे. तसेच त्याला एक मिनिटात तेथील जमीन देण्यासाठी नागरिकांनी सकारात्मकता दर्शविली आहे. याठिकाणी आधीपासूनच काही घरे आहेत. या नव्या कार्यालयात प्रशिक्षणाची सोय, झोपण्याची व्यवस्था, किट स्टोअरेजही आहे. आधीच्या इमारतीच्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणामुळे या सुविधा नव्हत्या. आमचा जॉब खूप काळजीचा आणि जबाबदारीचा असतो. थोडे जरी लक्ष विचलित झाले, तरी अनर्थ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशाप्रकारच्या सुविधा पुरविण्याची गरज असते, असे क्रू मेंबर डॉ. नेल बेरी यांनी म्हटले आहे. एखादी दुर्वेवी घटना घडल्यास पेशंटला त्या धक्क्यातून सावरणेही महत्त्वाचे असते. त्यामुळे चॅरिटीच्या माध्यमातून ही सुविधा पुरविली जाते. इंग्लंडमघ्ये काही विशिष्ट शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरमहा साधारणत: १५0 मिशन यशस्वी केले जातात, असेही त्यांनी सांगितले. विल्यम्सला चार दिवस काम आणि चार दिवस विश्रांती असते. तो त्याचा पूर्ण पगार देखील चॅरिटीला देतो. एअर अँम्बुलन्स चॅरिटीला हे काम सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी सुमारे १0.५ दशलक्ष पाऊंडची गरज असते. विल्यम त्याच्या कामातून मिळणारी कमाई यासाठी देतो.