​‘स्टार्टअप’मध्ये तरुण लीडर्सना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2016 05:11 PM2016-07-28T17:11:27+5:302016-07-28T22:41:27+5:30

​‘टीमलीज सर्व्हिसेस’ने केलेल्या सर्व्हेमध्ये ५२ टक्के महिला कर्मचाऱ्यांनी तरुण बॉससोबत काम करण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगितले.

Priority of young leaders in 'startup' | ​‘स्टार्टअप’मध्ये तरुण लीडर्सना प्राधान्य

​‘स्टार्टअप’मध्ये तरुण लीडर्सना प्राधान्य

Next
ुतांश आॅफिस कर्मचाऱ्यांची किंवा नोकरदार वर्गाची सर्वात मोठी डोकेदुखी कोणती असेल तर ती म्हणजे ‘बॉस’. आॅफिसमधील आपले वरिष्ठ किती जाचक, निर्दय, कठोर आहेत याचा पाढे हमखास वाचणारे लोक आजूबाजूला सहज दिसतात. मग कशा प्रकारच्या बॉससोबत लोकांना काम करायला आवडेल असे एका सर्वेक्षणात विचारले असता अनेक रंजक तथ्ये समोर आलेत.

जगातील समुारे ३३ टक्के कर्मचारी त्यांच्या वयापेक्षा तरुण बॉससाठी काम करतात. आजच्या स्टार्टअपच्या युगात कंपनी सीईओंचे सरासरी वय झपाट्याने कमी झाले आहे.

‘टीमलीज सर्व्हिसेस’ने केलेल्या सर्व्हेमध्ये ५२ टक्के महिला कर्मचाऱ्यांनी तरुण बॉससोबत काम करण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगितले. तर स्टार्टअप इंडस्ट्रीमधील ७५ टक्के पुरुषांनी त्यांच्या वयापेक्षा कमी वय असलेल्या बॉससाठी काम करण्यास हरकत नसल्याचे मान्य केले.

कमी वयाच्या बॉससोबत काम करताना अधिक  चांगले काम होत असल्याचे ४१ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र स्टार्टअप वगळता इतर क्षेत्रांत काम करणाऱ्या दीर्घानुभवी कर्मचाऱ्यांनी मात्र आपल्यापेक्षा जास्त वयाच्या वरिष्ठांखाली काम करण्यास पसंती दर्शवली. त्यांच्या मते, वयाने वरिष्ठ असलेले बॉस अधिक कार्यकुशलतेने संस्थेचा कारभार सांभाळू शकतात. यावर तुमचे मत काय?

Web Title: Priority of young leaders in 'startup'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.