​प्रोडक्टिव्हिटी ठरू शकते नैराश्याचे मापक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2016 12:53 PM2016-08-17T12:53:02+5:302016-08-17T18:25:05+5:30

डिप्रेशन असलेला व्यक्ती उपचारांना कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे यावर त्याच्या कामाच्या प्रोडक्टिव्हिटीवरून देखरेख ठेवली जाऊ शकते.

Productivity can be a measure of depression | ​प्रोडक्टिव्हिटी ठरू शकते नैराश्याचे मापक

​प्रोडक्टिव्हिटी ठरू शकते नैराश्याचे मापक

Next
ाच्या कॉर्पोरेट आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या युगात ‘प्रोडक्टिव्हिटी’ हा परवलीचा शब्द बनला आहे. आपली क्षमता आणि उपलब्ध साधनांचा वापर करून आपण किती प्रमाणात गुणवत्तापूर्ण कामे करतो यावरून आपली प्रोडक्टिव्हिटी ठरत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, की प्रोडक्टिव्हिटीवरून तुम्ही केवळ कामाचे मुल्यमापनच नाही तर व्यक्तीच्या नैराश्याबाबत जाूण शकतो.

भारतीय वंशाच्या संशोधकाचा सामावेश असलेल्या एका गटाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, डिप्रेशन असलेला व्यक्ती उपचारांना कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे यावर त्याच्या कामाच्या प्रोडक्टिव्हिटीवरून देखरेख ठेवली जाऊ शकते.

या संशोधनात तीव्र नैराश्य असलेल्या ३३१ रुग्णांची प्रोडक्टिव्हिटी आणि नैराश्याच्या लक्षणांचा सहा, तीन अणि सात आठवड्यांच्या अंतराने अभ्यास करण्यात आला. यातून असे आढळून आले की, वैद्यकीय उपचारांमुळे रुग्णांची प्रोडक्टिव्हिटी वाढली परंतु ज्यांच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ झाली त्यांच्या नैराश्यामध्ये कमालीची घट दिसून आली.

वरिष्ठ संशोधक मधुकर त्रिवेदी यांनी सांगितले की, डिप्रेशनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची जर प्रोडक्टिव्हिटी खालावलेली असेल तर दीर्घकाळासाठी त्यांना व्यायाम आणि कॉग्नेटिव्ह थेरपी यासारख्या अधिक उपचारांची गरज असते.

Web Title: Productivity can be a measure of depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.