​PROPOSE DAY SPECIAL : गर्लफ्रेंडला ‘प्रपोज’ करताना !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2017 12:02 PM2017-02-07T12:02:34+5:302017-02-07T17:32:34+5:30

आपण आपल्या ड्रीम गर्लला प्रपोज करण्याचा मनात विचार केला असेल आणि आपणास त्यांना प्रपोज करायचा असेल तर घाई नको. त्या अगोदर काही खास तयारी सोबतच काही विशेष गोष्टींचीही तयारी असावी.

PROPOSE DAY SPECIAL: Girlfriend 'proposing'! | ​PROPOSE DAY SPECIAL : गर्लफ्रेंडला ‘प्रपोज’ करताना !

​PROPOSE DAY SPECIAL : गर्लफ्रेंडला ‘प्रपोज’ करताना !

Next
ong>-Ravindra More

आपण आपल्या ड्रीम गर्लला प्रपोज करण्याचा मनात विचार केला असेल आणि आपणास त्यांना प्रपोज करायचा असेल तर घाई नको. त्या अगोदर काही खास तयारी सोबतच काही विशेष गोष्टींचीही तयारी असावी. आजच्या सदरात आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना काय काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊया.

* प्रपोज करताना आपण एका भारतीय मुलीला प्रपोज करीत आहोत याचे भान असू द्या, मग ती कितीही मॉडर्न असेल. मात्र तिचे ह्रदय तर भारतीय आहे. अशावेळी प्रपोज करताना खरच घाई नको. 

* शिवाय सर्वप्रथम हे देखील आपणास माहित असावे की, आपण ज्या मुलीला प्रपोज करणार आहोत तिचीपण तुमच्यात आवड आहे की नाही. नाहीतर उगाच आपण नाराज व्हाल.

* प्रपोज करण्याअगोदर आपल्या ड्रीम गर्लची आवड-नावड याबाबतही जाणून घ्या.

* ती कोणात तरी बिजी तर नाही ना किंवा ती कोणाला तरी लाइक तर करीत नाही ना, याबाबतही सुनिश्चित करुन घ्या. 

* कुठलेही नाते हे वेळेबरोबर घट्ट होत जाते. अशावेळी आपल्या ड्रीम गर्लला आपण किती प्रेम करतोय हे सांगाण्याची गरज नसते. आपले बोलणे आणि आपल्या वागण्याद्वारे समजू द्या की आपण किती प्रेम करता ते. मात्र आपले नाते विना आपल्या प्रपोजचे पुढे वाढू शकत नाही, यासाठी योग्यवेळी हिंट देत राहा. 

* आपण आपल्या पार्टनरला ही जाणिव करुन द्या की, तुम्ही त्यांच्या फॅमिलीविषयी जाणून घेण्यात इंटरेस्टेड आहात आणि सोबतच आपण व आपल्या परिवाराबाबतही माहिती शेअर करत राहा.

* जेव्हाही आपण आपल्या पार्टनरला प्रपोज करणार त्याप्रसंगी तिसरा कोणी नसावा. अशावेळी आपल्या पार्टनरसमोर आपली इमेज खराब होऊ शकते. शिवाय याबाबत आपण कॉन्फिडेंडदेखील राहा. 

* हा दिवस आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी आपला ड्रेसकोडही व्यवस्थित असावा. 

* या दिवशी काही वेगळे आणि क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. असे वाटायला हवे की, या अगोदर कोणीच कोणाला अशा पद्धतीने प्रपोज केला नसेल. 

* ही क्रिएटिव्हिटी आणि आपला व्यवहार आपल्या पार्टनरला आपल्या जवळ आणण्यास खूप मदत करेल.   

Also Read : ​‘ROSE DAY SPECIAL' : प्रेमात गुलाबाचे महत्त्व वेगळेच!

Web Title: PROPOSE DAY SPECIAL: Girlfriend 'proposing'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.