PROPOSE DAY SPECIAL : मुलीला प्रपोज करायचंय? वापरा या १० क्रिएटिव्ह टिप्स !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2017 12:17 PM2017-02-07T12:17:17+5:302017-02-07T17:50:25+5:30
आपणही एखाद्या मुलीवर प्रेम करीत असाल आणि तिला प्रपोज करायचं असेल आम्ही आपणास १० क्रिएटिव्ह टिप्स देत आहोत ज्या फॉलो केल्यास आपला पार्टनर नक्कीच रोमॅँटिक फिल करेल.
Next
प्रेमाचा आठवडा सुरू झाला. प्रत्येकजण कोणावर तरी प्रेम करीत असतो. बरेचजण आपले प्रेम व्यक्त करायला घाबरतात. जर आपणही एखाद्या मुलीवर प्रेम करीत असाल आणि तिला प्रपोज करायचं असेल आम्ही आपणास १० क्रिएटिव्ह टिप्स देत आहोत ज्या फॉलो केल्यास आपला पार्टनर नक्कीच रोमॅँटिक फिल करेल.
१. टी-शर्ट प्रपोजल
एक चांगल्या दर्जाचा पांढऱ्या रंगाचा राउंड-नेक टी-शर्ट घ्या आणि त्यावर समोरच्या व्यक्तीचे नाव आणि ‘आय लव्ह यू’ असे प्रिंट करुन द्या. हा पर्याय एक चांगला क्रिएटिव्ह ठरेल शिवाय आपला पार्टनर खूप आनंदीही होईल. ती व्यक्ती हे टी-शर्ट जॅकेट किंवा शर्टच्या मध्ये परिधान करुन कॉलेज किंवा बाहेरगावी जाईल तेव्हा तिला नक्कीच तुमच्या प्रेमाची आठवण होईल.
२. यू ट्यूब प्रपोजल
तिला प्रपोज करतानाचा एक व्हीडिओ शूट करा आणि त्या व्हीडिओला यू ट्यूबवर अपलोड करा. त्यानंतर तिला एखाद्या गंभीर आवाजाने त्या व्हीडिओची लिंक पाठवा. त्याच बरोबर आपले जे काही म्हणणे असेल त्या संबंधित काही कंटेन्ट्सही पाठवा. ती लिंक उघडल्यानंतर विचार करा तिची प्रतिक्रिया काय असेल. हा क्रिएटिव्ह व्हीडिओ तिच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरेल.
३. अलार्म प्रपोजल
तिचा मोबाइल आपल्या हातात घेऊन पहाटे २ वाजेचा अलार्म सेट करा. (ती जेव्हा झोपलेली असेल) त्या अलार्ममध्ये तुम्ही ‘उठ संगीता, रवी लव्हज यू...’ असा आवाज रेकॉर्ड करा. पाहा जेव्हा ती हा अलार्म ऐकून झोपेतून उठेल तेव्हा तिला खरच वेगळे फिल होइल.
४. सुपर ड्रामास्टिक अलार्म प्रपोजल
जर आपणास ड्रामा किंग व्हायचे असेल तर स्वत:ला थांबवू नका. त्यासाठी तिला न कळता तिच्या एखाद्या नोटबुकमध्ये एक चांगला रोमॅँटिक मेसेज लिहा आणि तिला हे कळण्यासाठी तिच्या मोबाइलमध्ये अलार्म सेट करा. ही क्रिया तुम्ही साखळीप्रमाणे सुरू ठेऊ शकता, मात्र तिचा नकार येईल तोपर्यंत तिला बोअर करू नका.
५. की-प्रपोजल
एक चावी (की) तिच्या घरी कुरिअरने पाठवा. त्यावेळी चावी का पाठविली याबाबत काहीही स्पष्टीकरण देऊ नका. काही दिवसानंतर तिला एक नोट पाठवा, त्यात ‘तुला ती चावी मिळाली का?’ असे लिहून पाठवा. अजून काही दिवसानंतर एक शेवटची नोट पाठवा, आणि त्यात लिहा की, तुला ती चावी मी पाठविली असून ती चावी नसून माझे ह्रदय आहे. ते ह्रदय मी तुला देऊ इच्छितो.’ हे वाचून नक्कीच तिच्या डोळ्यात अश्रू येतील. (मात्र मुलगी निवडताना चूक करू नका.)
६. ‘बॉक्स्ड’ प्रपोजल
एक चांगले गिफ्ट घेऊन एका बॉक्समध्ये गुंडाळून तिच्या घरी पाठवा. ते गिफ्ट एका मोठ्या बॉक्समध्ये दुसरा लहान बॉक्स ठेऊन त्यात ठेवा. हे एक क्लासिक बॉक्स प्रपोजलदेखील असते. यात तुम्ही एकमेकात असे अनेक बॉक्स ठेऊन शेवटच्या लहान बॉक्समध्ये एक चावी ठेवा. त्या चावीसोबत ‘ही चावी म्हणजे माझे ह्रदय आहे, ते मी तुज्याजवळ पाठवित आहे...’ असे लिहून पाठवा. (हे सर्व पाठविताना आपले नाव आणि सही करायला विसरु नका.)
७. ‘द मील इन बॉक्स’ प्रपोजल
एक कॉलेज किंवा आॅफिसच्या कॅन्टिनचा विश्वासातला व्यक्ती घ्या. त्याला तुमचा प्लॅन समजवा. ती जेव्हा कॅन्टिनमध्ये येईल तेव्हा काहीतरी आॅर्डर करेल. तेव्हा तिच्याजवळ तेथील वेटरकडून एक प्लेट प्राप्त होईल अन् त्यात एक चिठ्ठी असेल, त्यात लिहिलेले असेल, ‘आजचे प्रेमाचे जेवण फक्त राहुलसोबत...’ हे असे सरप्राइज पाहून ती नक्कीच आनंदी होईल.
८. ‘द मेझ’ प्रपोजल
तिला बॉसने किंवा कॉलेजच्या प्राध्यापकाने कार्यालयात बोलाविले आहे हे सांगण्यासाठी एक विश्वासू व्यक्ती तयार करा. मात्र ती वेळ जेवणाची हवी कारण त्यावेळी कार्यालयात बॉस किंवा प्राध्यापक नसतील. जेव्हा ती कार्यालयाकडे रवाना होईल तेव्हा तिला कार्यालयाचा दरवाजा बंद दिसेल आणि त्यावर एक दिशा दर्शक बाणाची खूणही दिसेल. उत्सुकतेपोटी ती त्या दिशेने जाईल. आपण काही दिशादर्शक बाणांचा वापर करु शकता. बाणांच्या दिशाने ती शोधत शोधत एक ठिकाणी पोहोचेल आणि त्याठिकाणी एका पृष्ठावर लिहिलेले असेल की, ‘शेवटी तुला राहुलचे ह्रदय सापडले...’ अशा क्रिएटिव्ह पद्धतीने दिलेला संदेश तिला नक्कीच आवडेल.
९. द पिक्चर परफेक्ट प्रपोजल
तिचा फोटो आणि तुमचा फोटो फोटोशॉपच्या साह्याने एकत्र करा. या फोटोवर एक चांगला रोमॅँटिक मेसेज किंवा ‘आपण एकत्र यावे ही परमेश्वराचीच इच्छा आहे.’ असा संदेश देऊ इच्छिता.
१०. ‘द टाईम बॉम्ब प्रपोजल’
तिला एक बनावट मेलच्या साह्याने ईमेल पाठवा, त्यात लिहा की, आजपासूनचा दहावा दिवस आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस असेल. असाच मेल दुसऱ्या दिवशीही पाठवा, त्यात ‘आजपासूनचा नववा दिवस आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस असेल’ असे लिहून पाठवा. असा मेल प्रत्येक दिवशी एक-एक दिवस कमी होणारा पाठवा. आणि दहाव्या दिवशी एक चांगला रोमॅँटिक मेसेज तिच्या डेस्कवर पाठवा.
अशा पद्धतीने विविध क्रिएटिव्ह टिप्स फॉलो करुन आपल्या पार्टनरला प्रपोज करु शकता.
Also Read : PROPOSE DAY SPECIAL : गर्लफ्रेंडला ‘प्रपोज’ करताना !
: ‘ROSE DAY SPECIAL' : प्रेमात गुलाबाचे महत्त्व वेगळेच!