राणीच्या ‘या’ जॅकेटची किंमत ऐकून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 11:10 AM2017-11-25T11:10:51+5:302017-11-25T16:46:21+5:30

हा लूक मिळविण्यासाठी राणी मुखर्जीला तब्बल १ लाख ३० हजार रुपये मोजावे लागले आहेत. हे जॅकेट ब्रिटिश फॅशन ब्रॅँड बेलस्टाफद्वारा खरेदी करण्यात आले आहे.

The Queen will appreciate the jacket price! | राणीच्या ‘या’ जॅकेटची किंमत ऐकून व्हाल थक्क !

राणीच्या ‘या’ जॅकेटची किंमत ऐकून व्हाल थक्क !

googlenewsNext
ही दिवसांपूर्वी करिना कपूरच्या शर्टाची किंमत ५७ हजार ऐकून आपण अवाक झालो होतो. आता तर राणीच्या या स्पोर्टी लूकने आपणास तर घायाळच केले आहे. तिने या स्पोर्टी लूकमध्ये एक काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले असून खूपच गॉर्जिअस दिसत आहे. आपण विचार केला अहे का की या जॅकेटची किंमत किती असेल. राणीचा हा फोटो पाहून आपणास हॉलिवूडचा चित्रपट ‘द अवेंजर्स’मधली ब्लॅक विडो आठवली असेल. हा लूक मिळविण्यासाठी राणी मुखर्जीला तब्बल १ लाख ३० हजार रुपये मोजावे लागले आहेत. हे जॅकेट ब्रिटिश फॅशन ब्रॅँड बेलस्टाफद्वारा खरेदी करण्यात आले आहे.  

राणी मुखर्जी नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पोर्टी लूकमध्ये स्पॉट झाली होती. यावेळी तिने व्हाइट स्पोर्ट शूज, ब्ल्यू रिप्ड जिन्ससोबत ब्लॅक कलरचे लेदर जॅकेट घातलेले होते. दिसायला राणीचा लूक सिंपल दिसत असला तरी तिने जे जॅकेट घातलेले होते ते फार महागडे होते.

राणीला एअरपोर्टवर अ‍ॅव्हेंजर लूक देणारे हे जॅकेज १४९५ पाऊंडचे आहे. भारतीय करन्सीमध्ये याची किंमत जवळपसा १ लाख ३० हजार रुपये होईल. राणीच्या एका जॅकेटच्या किंमतीमध्ये एक बुलेट क्लासिक ३५० खरेदी करता येऊ शकते. या बुलेटची किंमत १ लाख ३६ हजार रुपये आहे. राणीचे जॅकेट महागडे नक्कीच आहे, मात्र हे जॅकेट राणीला क्लासी लूक देत होते यात शंका नाही.

१ लाख ३० हजार आपल्यासाठी खूप मोठी रक्कम आहे, मात्र देशाच्या सर्वात मोठ्या फिल्म प्रोडक्शन कंपनीच्या मालकाच्या पत्नीसाठी नव्हे. राणी मुखर्जी तशी डाउन-टू-अर्थ फॅशनमध्ये विश्वास ठेवते, मात्र तिचा हा नवा लूक पाहून असे वाटते की, बॉलिवूड कमबॅकसाठी ती तयारीत तर नाही ना?  

Web Title: The Queen will appreciate the jacket price!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.